मुंबई गोवा महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात.
२ जखमी तर १ गंभीर जखमी.
माणगाव : तालुक्यात मौजे तिलोरे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल मानस समोर ४ वाहनांचा १९ मे रोजी सायंकाळी ५:१५ ते ५:३० वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला आहे. ह्या अपघातात एकूण तीन प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. त्यापैकी एकाची परिस्थिती गंभीर आहे.
या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे केमिकल वाहतूक करणारा टँकर क्रमांक एम एच ०६ बी डब्ल्यू ९५८८ याने इंडियन ऑईल पेट्रोल पंपातून बाहेर निघणारी इर्टिगा कार क्रमांक एम एच १२ डब्लू यू २२०७ ला पहिली ठोकर दिली. त्यानंतर पंपातून बाहेर निघणारी खाजगी प्रवासी वाहतूक बस क्रमांक एम एच ४७ बी एल ९३४४ ठोकर दिली त्यामुळे बस पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूस उभी असणारी रिक्षा क्रमांक एम एच ०६ बी व्हि २६५१ वर जाऊन आदळली असा हा भयानक व विचित्र अपघात घडला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की ४ ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा संपूर्ण अपघात सी सी टीव्ही मध्ये कैद झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav