खोपोलीत व्यसनमुक्तीच्या दिशेने पोलीसांचा पुढाकार....
पानटपरी चालकांची विशेष बैठक; गुटखा, ई-सिगारेट, व्हेप व प्रतिबंधित पदार्थ विक्री टाळण्याचे आवाहन..
वावोशी / जतिन मोरे : खोपोली शहरातील नागरिक, विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकू नये, समाज आरोग्यदायी राहावा आणि अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचावेत या सामाजिक जाणीवेतून खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील पानटपरी चालकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रभारी पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी गुटखा, ई-सिगारेट, व्हेप, हुक्का, फुलचंद पान तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले.
यावेळी युवक आणि विद्यार्थी वर्गामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. क्षणिक आर्थिक फायद्यासाठी विकल्या जाणाऱ्या अशा पदार्थांमुळे अनेक कुटुंबांवर आरोग्य आणि आर्थिक संकट ओढवत असल्याचे सांगण्यात आले. तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे वाढते प्रमाण ही समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीदरम्यान शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांची विक्री करताना कोणीही आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र ही कारवाई केवळ दंडात्मक नसून समाजहितासाठीची पूर्वसूचना असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शहरातील प्रत्येक व्यावसायिकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
विशेष म्हणजे, बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पानटपरी चालकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रतिबंधित पदार्थांची विक्री टाळण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. “व्यवसायासोबत समाजाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी पोलीसांच्या या जनजागृती उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे खोपोली शहर व्यसनमुक्त आणि अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times