सी एफ आय तर्फे आदिवासी मध्ये बालविवाह व अर्धवट शिक्षण समस्येवर जनजागृती कार्यक्रम संपन्न.
पेण : चिल्ड्रेन्स फ्युचर इंडिया (CFI) संस्थेच्या वतीने ग्रामीण व आदिवासी भागातील वाढत्या बालविवाह, अल्पवयीन मुला-मुलींमधील प्रेमसंबंध तसेच शिक्षण अर्धवट सोडण्याच्या समस्यांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी नवघर गावामध्ये विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १२ मे २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला गावकरी, पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चिल्ड्रेन्स फ्युचर इंडिया (CFI) चे सी.इ.ओ. व संचालक डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण टिकून राहावे, बालविवाह व शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुलांमध्ये योग्य जागरूकता निर्माण व्हावी, शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेवून CFI च्या माध्यमातून जास्तीत जास्त शिकावे, आपला आर्थिक स्तर उंचवावा. या उद्देशाने CFI संस्था सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पेण पोलीस ठाण्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये पोलीस विभागामार्फत सौ. सारिका घरत यांनी उपस्थितांना अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेशी संबंधित कायदेशीर बाबी, शिक्षणाचे महत्त्व तसेच चुकीच्या निर्णयांमुळे मुलांच्या भविष्यात होणारे गंभीर परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.
चिल्ड्रेन्स फ्युचर इंडिया (CFI) संस्था गेली अनेक वर्षे पेण, खालापूर व माणगाव तालुक्यातील १३० हून अधिक गावांमध्ये शिक्षण, आरोग्य व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून ग्रामीण व आदिवासी भागातील सामाजिक समस्यांवर प्रभावीपणे काम करत आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी CFI संस्थेकडून विविध जनजागृती उपक्रम, समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम नियमितपणे राबविले जात आहेत.
या कार्यक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन मुलांच्या शिक्षण व सुरक्षित भविष्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी चिल्ड्रेन्स फ्युचर इंडिया (CFI) व पेण पोलीस विभागाचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times