गेल प्रोपेन पाइपलाईन मुळे नागरीकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न ?????
पेण : पेण तालुक्यातिल १३ गावांच्या लगतहून नेण्यात येत असलेल्या GAIL इंडिया लिमिटेडच्या उच्च दाबाच्या प्रोपेन गॅस पाइपलाईन प्रकल्पा विरोधात “२४ गाव सेझ विरोधी शेतकरी संयुक्त कृती समिती - पेण, रायगड” यांनी आज दि. २०/०५/२०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, पेण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाने सदर पाइपलाईन ही मूळ CRZ मंजुरीच्या व्याप्तीच्या विरोधात जाऊन दाट लोकवस्ती, सुपीक भातशेती, हेटवणे सिंचन प्रकल्प लाभक्षेत्र आणि गावांच्या लगतून नेली जात असल्याचा गंभीर आरोप केला. या वेळी पाइपलाईनमुळे भविष्यात सार्वजनिक सुरक्षितता, पर्यावरण, शेती, जलस्रोत व ग्राम-विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
सादर निवेदनामध्ये CRZ मंजुरी, पर्यावरणीय परिणाम, सामाजिक परिणाम मूल्यांकन (SIA), आपत्ती जोखीम मूल्यांकन (DRA), जनसुनावणी प्रक्रिया आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारी संदर्भात गंभीर विसंगती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उच्च दाबाच्या अती-ज्वलनशील प्रोपेन गॅसची वाहतूक दाट लोकवस्ती मधून करण्यात येत असताना ग्रामपंचायती, स्थानिक नागरिक, अग्निशमन यंत्रणा व प्रशासनाला कोणतीही सविस्तर आपत्कालीन माहिती अथवा सुरक्षा आराखडा उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. भविष्यात दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रकल्पाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून काम तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी “२४ गाव सेझ विरोधी शेतकरी संयुक्त कृती समिती - पेण, रायगड” चे अध्यक्ष कॉ. काशिनाथ पाटील, सचिव हर्षल पितळे, नंदाताई म्हात्रे, राजेंद्र झेमसे, प्रितेश माळी, राजेंद्र म्हात्रे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधित प्रकल्प हा केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय विषय नसून स्थानिक नागरिकांच्या जीवन, सुरक्षितता, शेती व पर्यावरणाशी निगडित गंभीर सार्वजनिक प्रश्न असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. तसेच अंतिम निष्कर्ष येईपर्यंत पाइपलाईनचे काम तात्काळ थांबवून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times