‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

“पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नागाव ग्रामपंचायतीचा हायटेक प्रयोग यशस्वी"

बुडणाऱ्यांसाठी काही सेकंदांत मदतीला धावणारे आधुनिक जीवरक्षक तंत्रज्ञान

अलिबाग : नागाव बीचवरील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली असून “रोबोटिक बोयो” हे आधुनिक जीवरक्षक उपकरण प्रत्यक्ष बचावकार्यात प्रभावी ठरत असल्याचे आज झालेल्या प्रात्यक्षिकातून स्पष्ट झाले. पाण्यात अडकलेल्या किंवा बुडणाऱ्या व्यक्तींपर्यंत काही क्षणांत पोहोचून मदत करणाऱ्या या यंत्रणेमुळे नागाव बीचवरील सुरक्षा व्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे.

या विशेष प्रात्यक्षिकाला कोकण विभागीय आयुक्त मा. श्रीमती रुबल अग्रवाल यांनी उपस्थित राहून यंत्रणेची कार्यपद्धती जाणून घेतली. “पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘रोबोटिक बोयो’ हे खऱ्या अर्थाने जीवनरक्षक तंत्रज्ञान आहे,” असे सांगत त्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नागाव बीचवरील पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध सूचना दिल्या. विशेषतः सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणे, पर्यटकांची माहिती नोंदविण्यासाठी प्रभावी प्रणाली उभारणे तसेच बीच परिसरातील सुविधा अधिक आधुनिक करण्यावर भर देण्यात आला.

सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागाव ग्रामपंचायतने पर्यटन विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. बीच सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक सुविधा यांचा समतोल राखत नागावला आदर्श पर्यटनस्थळ बनविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

“रोबोटिक बोयो”सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा नागावच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून नागाव बीच भविष्यात राज्यातील सर्वात सुरक्षित, सुसज्ज आणि आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट