‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून पाणलोट बंधारेची उभारणी, परिसर होणार पाणीदार...!


लोकसहभागातून निवी हद्दीत बंधारे, उपक्रमाचे कौतुक

रोहा :  मुख्यतः कृषी, आरोग्य, शैक्षणीक क्षेत्र यांसह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून कृतीशील उपक्रम राबवणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची दीपक नायट्रेट कंपनी संचालीत दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी पाणलोट बंधारेची उभारणी केली जात आहे. वरसे ग्रा.पं.च्या निवी गाव हद्दीत लोकसहभागातून नैसर्गिक पाणी स्त्रोत ओहळांवर तब्बल ५ ठिकाणी पक्के बांधकामाचे पाटलोट बंधाऱ्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ओहळांवर पाणलोट बंधारे बांधले जाणार असल्याने सबंध परिसर अक्षरशः पाणीदार होणार, जमिनीत पाण्याचे मूल स्त्रोत पुनर्जीवीत होणार असल्याने दीपक फांऊडेशनच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, परिसरातील जमिनीत पाणी साठा कायम जीवित राहावे, परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावे हेच उद्देश पाणलोट बंधारे बांधण्यामागील आहे. पाणी स्त्रोताचा शेतकऱ्यांना फायदा होईल अशी भावना प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम यांनी दिली तर निवी हद्दीतील नैसर्गिक ओहळावर पाणी आडवा, पाणी जिरवा भावनेतून दीपक फाऊंडेशन ठिकठिकाणी बंधारे बांधणीची उभारणी करत आहे. याचे आम्हा ग्रामस्थांना निश्चित समाधान आहे. लोकसहभागातून पाण्याची समृद्धी सुखावणारी आहे. अशी प्रतिक्रिया माजी सरपंच अमित मोहिते यांनी व्यक्त केली.

दीपक नायट्रेट संचालीत दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून निवी, तळाघर सर्व परिसरात आरोग्य, शैक्षणिक, कृषी उपक्रम, मार्गदर्शन शिबीरे, कृषी योजनांची कृतीशील माहिती देण्यात दीपक फाऊंडेशन अग्रस्थानी आहे. रोहा तालुक्यातील अनेक गावे वाडी वस्त्यांवर विविध सेवा पुरविली जाते. शेतकऱ्यांना पूरक साहित्य, बी बियाणे, शासकीय योजनांची माहिती देण्यात नेहमीच पुढाकार राहिला आहे. शाळांत विविध उपक्रम साहित्य दिले गेले. याच दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून आता निवी हद्दीतील नैसर्गिक ओहळांवर पाणी आडवा पाणी जिरवा  संकल्पन्वये पाणलोट बंधारे काम हाती घेण्यात आले आहे. ५ ठिकाणी बंधारे  बांधण्याच्या कामाला सोमवारी प्रारंभ झाला. इतरत्र जागांची पाहणी प्रसंगी प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम समवेत ग्रामस्थ प्रशांत राऊत, राजेंद्र जाधव, संतोष बामुगडे, पप्पू राऊत, समवेत निरीक्षक प्रतिक मारणे, ठेकेदार व ग्रामस्थ उपस्थित होते. दोन नैसर्गिक ओहोळांच्या ५ ठिकाणी पाणलोट बंधारे बांधण्यात येणार आहे.  बंधारेतून पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाईल, पाणी स्तोत्र जिवंत राहील, त्याचा लाभ शेती, झाडे  एकंदर पर्यावरणाला होईल, हा लोकसहभागातून अभिनव उपक्रम आहे. दीपक फाऊंडेशन यापुढे अधिक प्रभावाने शेतकरी, पर्यावरण व अन्य बाबींवर काम करेल, लोकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली. लाखो रुपये निधी खर्चित दीपक फाऊंडेशन पाणलोट बंधारे  उभारत आहे. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. विविध उपक्रमासाठी आमचे सहकार्य कायम राहील, दीपक फांऊडेशनचे आभारी आहोत असे उपस्थित ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, दीपक फांऊडेशनच्या पाटलोट बंधारेचा आदर्श अन्य कंपनी सीएसआर विभागाने घ्यावा असेच अधोरेखीत झाले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट