दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून पाणलोट बंधारेची उभारणी, परिसर होणार पाणीदार...!
लोकसहभागातून निवी हद्दीत बंधारे, उपक्रमाचे कौतुक
रोहा : मुख्यतः कृषी, आरोग्य, शैक्षणीक क्षेत्र यांसह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून कृतीशील उपक्रम राबवणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची दीपक नायट्रेट कंपनी संचालीत दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी पाणलोट बंधारेची उभारणी केली जात आहे. वरसे ग्रा.पं.च्या निवी गाव हद्दीत लोकसहभागातून नैसर्गिक पाणी स्त्रोत ओहळांवर तब्बल ५ ठिकाणी पक्के बांधकामाचे पाटलोट बंधाऱ्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ओहळांवर पाणलोट बंधारे बांधले जाणार असल्याने सबंध परिसर अक्षरशः पाणीदार होणार, जमिनीत पाण्याचे मूल स्त्रोत पुनर्जीवीत होणार असल्याने दीपक फांऊडेशनच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, परिसरातील जमिनीत पाणी साठा कायम जीवित राहावे, परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावे हेच उद्देश पाणलोट बंधारे बांधण्यामागील आहे. पाणी स्त्रोताचा शेतकऱ्यांना फायदा होईल अशी भावना प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम यांनी दिली तर निवी हद्दीतील नैसर्गिक ओहळावर पाणी आडवा, पाणी जिरवा भावनेतून दीपक फाऊंडेशन ठिकठिकाणी बंधारे बांधणीची उभारणी करत आहे. याचे आम्हा ग्रामस्थांना निश्चित समाधान आहे. लोकसहभागातून पाण्याची समृद्धी सुखावणारी आहे. अशी प्रतिक्रिया माजी सरपंच अमित मोहिते यांनी व्यक्त केली.
दीपक नायट्रेट संचालीत दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून निवी, तळाघर सर्व परिसरात आरोग्य, शैक्षणिक, कृषी उपक्रम, मार्गदर्शन शिबीरे, कृषी योजनांची कृतीशील माहिती देण्यात दीपक फाऊंडेशन अग्रस्थानी आहे. रोहा तालुक्यातील अनेक गावे वाडी वस्त्यांवर विविध सेवा पुरविली जाते. शेतकऱ्यांना पूरक साहित्य, बी बियाणे, शासकीय योजनांची माहिती देण्यात नेहमीच पुढाकार राहिला आहे. शाळांत विविध उपक्रम साहित्य दिले गेले. याच दीपक फांऊडेशनच्या माध्यमातून आता निवी हद्दीतील नैसर्गिक ओहळांवर पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पन्वये पाणलोट बंधारे काम हाती घेण्यात आले आहे. ५ ठिकाणी बंधारे बांधण्याच्या कामाला सोमवारी प्रारंभ झाला. इतरत्र जागांची पाहणी प्रसंगी प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम समवेत ग्रामस्थ प्रशांत राऊत, राजेंद्र जाधव, संतोष बामुगडे, पप्पू राऊत, समवेत निरीक्षक प्रतिक मारणे, ठेकेदार व ग्रामस्थ उपस्थित होते. दोन नैसर्गिक ओहोळांच्या ५ ठिकाणी पाणलोट बंधारे बांधण्यात येणार आहे. बंधारेतून पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाईल, पाणी स्तोत्र जिवंत राहील, त्याचा लाभ शेती, झाडे एकंदर पर्यावरणाला होईल, हा लोकसहभागातून अभिनव उपक्रम आहे. दीपक फाऊंडेशन यापुढे अधिक प्रभावाने शेतकरी, पर्यावरण व अन्य बाबींवर काम करेल, लोकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली. लाखो रुपये निधी खर्चित दीपक फाऊंडेशन पाणलोट बंधारे उभारत आहे. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. विविध उपक्रमासाठी आमचे सहकार्य कायम राहील, दीपक फांऊडेशनचे आभारी आहोत असे उपस्थित ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, दीपक फांऊडेशनच्या पाटलोट बंधारेचा आदर्श अन्य कंपनी सीएसआर विभागाने घ्यावा असेच अधोरेखीत झाले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times