‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल*


 

*ऑनलाइन करभरणा सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली मोहीमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या दोन महिन्यांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात  १०० कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे.

दि. ३० मे २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत मालमत्ता करापोटी रु. १०१ कोटी १० लक्ष इतकी कर रक्कम जमा झालेली असून त्यापैकी ऑनलाइन माध्यमातून रु. ८० कोटी, बँक व्यवहार माध्यमातून रू. १९ कोटी तसेच प्रत्यक्ष करभरणा करणेच्या ऑफलाईन माध्यमातून रु. २ कोटी इतका कर जमा झालेला आहे.

यामध्ये नवी मुंबईकरांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर कोड, यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग तसेच विविध ऑनलाइन पर्यायांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये निवासी मालमत्तांमधून रु. २९.५२ कोटी, अनिवासी मालमत्तांमधून रु. २४.८५ कोटी आणि औद्योगिक मालमत्तांमधून रु. ४१.२१ कोटी इतका कर जमा झालेला आहे.

एकूण ३,५४,७३७ करदात्यांपैकी आत्तापर्यंत ५६,१६६ इतक्या नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.

महानगरपालिकेकडून नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही मालमत्ता कर बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून व व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट 8291920504 या क्रमांकावरूनही मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घेता येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे बिल मिळविण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या 8291920504 या अधिकृत क्रमांकावर Hi असा संदेश पाठवून पुढील सूचनांनुसार मालमत्ता क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर बिल लगेचच मोबाईलवर उपलब्ध होईल.

तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्तेशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कर भरण्याबाबत सूचना, बिल तसेच इतर महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर प्राप्त होण्यास मदत होत आहे.

तरी नागरिकांनी दि. ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरून अतिरिक्त २ टक्के अधिभार टाळावा तसेच ऑनलाइन व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

मोबाईल क्रमांक कसा लिंक कराल?

* महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

* ‘मालमत्ता कर’ या पर्यायावर क्लिक करून आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक नोंदवा.

* ‘Update Info  वर क्लिक करा.

* आपला मोबाईल क्रमांक टाकून Request OTP वर क्लिक करा.

* OTP टाकून Submit’ करा.

************************

नवी मुंबईकरांनी डिजिटल सुविधांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महानगरपालिकेच्या पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनावरील विश्वास दर्शविणारा आहे. क्यू आर कोड, यूपीआय, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट तसेच विविध ऑनलाइन सुविधांमुळे मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित झाली असून, मे महिन्यात प्रथमच १०० कोटींपेक्षा अधिक कर संकलन होणे ही महापालिकेसाठी अभिमानाची बाब आहे.


  - डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

……….......

 

 

नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्यासाठी विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन कर भरण्याचे प्रमाण यंदा सर्वाधिक नोंदविण्यात आले असून, नागरिकांनी दि. ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरून अतिरिक्त २ टक्के अधिभार टाळावा तसेच महापालिकेच्या ऑनलाईन सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा.


          - श्री. सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

                                                                        ……….......

 


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट