ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

स्मार्ट मीटर सक्ती विरोधात संतप्त शिवसैनिक (उबाटा ) महावितरण कार्यालयावर धडकले




जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवल्यास उद्भवणाऱ्या उद्रेकास महावितरण प्रशासन जबाबदार


पेण ( दीपक लोके ) :- महावितरण कडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येत असून अनेक ठिकाणी महावितरण कर्मचारी व वीज ग्राहक यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहे. जुने कार्यरत असलेले मीटर जबरदस्तीने बदलून त्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे वीज ग्राहकांमध्ये रोज निर्माण झाला असून वीज ग्राहकांच्या समस्या मांडण्याकरिता शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पेण येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला.

      या मोर्चात रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, माजी तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, पेणचे नगरसेवक प्रवीण पाटील, उपतालुकाप्रमुख संतोष पाटील, चेतन मोकल, लव्हेद्र मोकल, कांतीलाल म्हात्रे, युवा सेनेचे योगेश पाटील, विनोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, विभाग प्रमुख राजू पाटील, वसंत म्हात्रे, नंदु मोकल, गजानन मोकल, अनंत दिवेकर, संजय भोईर, शिवाजी म्हात्रे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका दर्शना जावके, माजी उपजिल्हा संघटीका सुनिता खाडे, समिर साटी, रविंद्र पाटील, प्रकाश म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, सुजित पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     मागील तीन चार दिवसांपासून महावितरणच्या ग्राहकाला महावितरण कडून व्हॅटस्अँप क्रमांकावर ४८ तासांत आपला जूना मिटर काढून स्मार्ट मिटर बसविण्यांत येणार आहे, या आशयाचा मेसेज येत आहे. यापूर्वी ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवला आहे त्यांना दुप्पट चौपट-लाईट बिल येत असल्याने वीज ग्राहकांचा या स्मार्ट मीटरला विरोध आहे.वीज ग्राहकांची मते विचारात न घेता सक्तीने मीटर बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट् इलेक्ट्रिसिटी अँक्ट २००३, ४७/५ अन्वये ग्राहकाला कुठला मिटर हवा हे ठरविण्यांचे अधिकार दिलेले आहेत. 

       स्मार्ट मिटरचा बिल विलंब झाला तर कार्यालयात बसून विद्युत पुरवठा खंडीत करुण्यात येतो असे तंत्रज्ञान त्या मिटरमध्ये आहे. थोडक्यात मीटर कार्यालयात बसून मॅनेज करता येत असल्याने वाढीव बिल येण्याची शंका ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे स्मार्ट मीटर संदर्भात अनेक तक्रारी आहेत. बऱ्याच राज्यांनी स्मार्ट मिटर बसविण्याच्या कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. जोपर्यत जनतेच्या शंकाचे निरसन होत नाही, तोपर्यंत आपण स्मार्ट मिटर सक्तीने बदलण्याची मोहीम स्थगित करावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. यावेळी ग्राहकांच्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड व उपअभियंता केतन थत्ते यांना देण्यात आले.

   गेले अनेक महिने वारंवार विज पुरवठा शहरी व ग्रामीण विभागात खंडीत होत आहे. याचे प्रमुख कारण वर्षानुवर्षे न बदली केलेल्या विद्युत वाहक तारा, जिर्ण झालेले विद्युत पोल, मागणी वाढवून देखील जुन्याच डी.पी. वर क्षमतेपेक्षा अधिक दिली गेलेली जोडणी या समस्या आपल्या खात्याकडून सूटत नसताना देखील या नवीन स्मार्ट मिटर बसविण्याचे सक्तीचे धोरण कशासाठी ?ग्रामीण व शहरी भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून त्याचा नागरिक, शेतकरी व उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसल्याने त्यांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत आहेत. महावितरणच्या सेवा व ग्राहकाभिमुखतेबाबत जनतेमध्ये असंतोष वाढत आहे.

   जोपर्यत अखंडीत व सुरळीतपणे विद्युत पुरवठा होत नाही, तोपर्यंत कुठेही स्मार्ट मिटर बसविले जाऊ नयेत. तशी सक्ती केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा ईशारा यावेळी प्रसाद भोईर यांनी दिला.


 प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती नसून पोस्टपेड स्मार्ट मीटर सुद्धा ग्राहकाची जनजागृती व शंकेचे निरसन केल्यानंतरच लावण्यात येतील. ग्राहकांच्या हरकती व शिवसेनेचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेण्यात येईल - कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट