ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

प्रोपेन गॅस पाइपलाईनवर पेणमध्ये संतप्त सवाल -



पेण दीपक लोके :-  येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि. १६ जून २०२६ रोजी उसर-अलिबाग-उरण उच्च दाब प्रोपेन गॅस पाइपलाईन प्रकल्पा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. “२४ गाव सेझ विरोधी शेतकरी संयुक्त कृती समिती' पेण, रायगड” यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रस्तावित रास्तारोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही बैठक आयोजित केली होती. बैठकीस बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बैठकीत प्रकल्पाच्या सार्वजनिक सुरक्षितता, पर्यावरण, शेती आणि ग्रामीण जीवनावर होणाऱ्या संभाव्य परिणामां बाबत नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. आवश्यक माहिती आणि अधिकृत कागदपत्रे सार्वजनिक न करता प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी ठाम भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समुद्रमार्गाचा पर्याय उपलब्ध असताना पाइपलाईन लोकवस्ती, सुपीक भातशेती आणि हेटवणे मध्यम सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून का नेली जात आहे, हा होता. नागरिकांनी सुरुवाती पासूनच पाइपलाईन समुद्रमार्गे नेण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. मार्ग निवड अभ्यास, पर्यायी मार्ग अहवाल, खर्च-लाभ विश्लेषण, समुद्रमार्ग व्यवहार्यता अहवाल आणि CRZ मंजुरीशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली. CRZ मंजुरीतील मार्ग आणि प्रत्यक्ष मार्गात तफावत असल्यास त्याचा खुलासा करावा, अशी मागणीही करण्यात आली. कमी जोखीम असलेला समुद्रमार्ग नाकारून मानवी वस्ती मधून पाइपलाईन नेण्याचा निर्णय सार्वजनिक हिताच्या कसोटीवर योग्य ठरतो का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
भूसंपादन आणि वापरहक्क संपादन प्रक्रियेतील त्रुटींचाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना सुनावण्यांचे निकाल मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला. सातबारा उताऱ्यांवर जलसंपदा विभागाचे शिक्के असतानाही संबंधित विभागाची परवानगी घेतली नसल्या बाबत प्रश्न उपस्थित झाले. जनसुनावणी न घेता, ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्यात येत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या माहितीपूर्ण संमतीच्या अधिकाराचा भंग झाल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. हेटवणे सिंचन लाभक्षेत्रातील शेती व सार्वजनिक गुंतवणुकीवर होणाऱ्या परिणामांचाही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली.
उच्च दाबाच्या ज्वलनशील प्रोपेन पाइपलाईनमुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नांवरही सखोल चर्चा झाली. संभाव्य स्फोट, आग किंवा गळतीच्या प्रसंगी लोकवस्ती, शाळा, रुग्णालये आणि बाजारपेठांवर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास झाला आहे का, याचा खुलासा मागण्यात आला. जोखीम मूल्यांकन अहवाल, स्फोट परिणाम अभ्यास, अग्निसुरक्षा लेखा-परीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडे सार्वजनिक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यातील गंज, नैसर्गिक आपत्ती आणि दीर्घकालीन देखभालीमुळे वाढणाऱ्या धोक्यांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. आवश्यक माहिती, अभ्यास अहवाल आणि अधिकृत कागदपत्रे सार्वजनिक होईपर्यंत प्रकल्पाची पुढील कामे तात्काळ स्थगित करण्यात यावीत, अशी ठाम मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट