ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांचा वाढदिवस विविध उपक्रमातून साजरा


बहुजन विद्यार्थी संघटनेकडून पडसरे आदिवासी आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.


पाली,(निशांत पवार) :- बहुजन विद्यार्थी संघटना रायगड जिल्हा व सुधागड तालुक्याच्या  वतीने बहुजन विद्यार्थी संघटनेचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी  यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्यातील पडसरे येथील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये वह्या, पेन व अन्य शैक्षणिक साहित्यांचा समावेश होता.
        अनिल वाणी  हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत असून, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला अभिवादन म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागावा या उद्देशाने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांना टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
         या कार्यक्रमास बहुजन विद्यार्थी संघटना रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सदस्य रमेश जाधव, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष निशांत पवार, सुधागड तालुका अध्यक्ष ऍड. सुशील गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, संपर्कप्रमुख चेतन भालेराव तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


         शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान आणि उमटलेले स्मितहास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला आनंद पाहून उपस्थित पदाधिकाऱ्यांनाही समाधान व्यक्त केला. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अशाच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी संघटनेकडून  सांगण्यात आले. विशेष म्हणजे योगायोगाने  दि.१५ जून हा शाळा सुरु होण्याचा पहिला दिवस व अनिल वाणी यांचा वाढदिवस देखील १५ जून असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शाळेचा पहिला दिवस असल्याने पालीतील व्यावसायिक किरण खंडागळे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी गुलाब जाम देण्यात आले.
     या स्तुत्य उपक्रमाबाबत  शाळेचे मुख्याध्यापक संदीप शिंदे यांनी बहुजन विद्यार्थी संघटनेचे आभार मानले. यावेळी माध्य ल. शिक्षक गणेश परशुराम महाडिक, शिक्षिका  गार्गी गणेश चोरगे, प्राथ. मुख्यध्यापिका मीनाक्षी  संभाजी ढोपे, प्राथ. शिक्षिका दिपाली  संतोष घरट, पदवीधर प्राथ. शिक्षिका श्वेता नितीन जाधव, प्राथ. शिक्षक सुधीर विनायक क्षीरसागर, शिक्षक राजू  यशवंत मोरे, शिक्षिका मेघना मुकुंद भडवलकर आदिंसह अधीक्षक किरण माळी, अधिक्षिका  मनीषा  इंगळे, अनिल साजेकर, मयूर सूर्यवंशी उपस्थित होते.  

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट