डोळे तपासणी शिबिर संपन्न .. .. ..
सी.एफ.आय/ आणि लायन्स क्लब, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन.
पेण: सी.एफ.आय आणि लायन्स क्लब, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २० जून २०२६ रोजी CFI कार्यालयात डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये प्रतीपालीत मुले, त्यांचे पालकआणि CFI कर्मचारी सहभागी झाले होते. आणि त्यांचा उत्तम प्रतिसाद शिबिरासाठी मिळाला. डोळ्यांची तपासणी करून दृष्टीदोष ओळखणे, आवश्यक मार्गदर्शन करणे आणि गरजेनुसार औषधे उपलब्ध करून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.त्या नुसार माशिनिद्वारे डोळ्यांची तपासणी केली गेली आणि योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक तेनुसार मलम आणि ड्रॉप दिली गेली.
नेत्र तपासणी शिबिरामुळे डोळ्यांची तपासणी वेळेत होऊ शकली. अनेक लाभार्थ्यांमध्ये दृष्टीदोष ओळखून त्यांना चष्मा वापरण्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. काहींना नवीन चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले, तर गंभीर समस्या असलेल्या लाभार्थ्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
या शिबिरामुळे डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाली तसेच मोफत तपासणी व मार्गदर्शनामुळे लाभार्थ्यांना मोठा फायदा झाला. वेळेवर निदान आणि उपचारामुळे भविष्यातील नेत्रविकार टाळण्यास मदत झाली. त्यामळे सर्वत्र सी. एफ आय आणि लायन्स क्लब संस्थेचे आभार व्यक्त केले जात आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times