भर पावसात बाहे येथे घराची संरक्षण भिंत कोसळली,घर मालकाचे मोठे नुकसान.
रोहा :- रोहा तालुक्यातील मौजे बाहे येथील मोल मजुरी करणारे शंकर अंबाजी देवकर यांच्या घरालगत असलेली संरक्षण भिंत सोमवार, मंगळवार आली बुधवार झालेल्या जोराच्या पावसामुळे बुधवारी पहाटेच्या सुमारास पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याच्या पाण्याचा मोठा गुरुळ लागल्याने ती कोसळली मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून ही भिंत कोसळल्याने देवकर यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
सदरच्या घटनेची सविस्तर माहिती अशी की बाहे गावचे रहिवाशी मोल मजुरी करणारे शंकर अंबाजी देवकर यांचे राहते घर टेकडीवर अधांतरी असल्याने या घराची येत्या पावसाळ्यात कोसळल्याची भीती मनात येत असल्याने त्यांनी स्व.खर्चाने व कुंटुंब समावेत मेहनतीने घराला संरक्षण मिळावे म्हणून मागील में महिन्या अखेर ही भिंत जांभा दगड सिमेंट मध्ये जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करून पक्की बांधण्यात आली होती अशी माहिती घर मालक शंकर देवकर यांनी दिली असून सोमवार,मंगळवार,आणि बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली त्यात घरा शेजारील पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याला अचानक गुरुल पडला आणि त्याचे पाणी घराचे आणि संरक्षण भिंतीचे बांधकामात घुसल्याने ही भिंत पडली असल्याचे सांगितले.
तर पावसात अचानक संरक्षण भिंत कोसळली ही माहिती गावचे पोलीस पाटील मनोज थिटे आणि ग्रामस्थ यांनी पाहणी करत सदरील अधिकारी वर्गाला माहिती दिली.तर चिल्हे तलाठी सजाचे तलाठी रोहित राजने यांनी या घटनेची माहिती घेत याचा पंचनामा करून नुकसानग्रस्त घर मालक यांना योग्य ती मदत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे तलाठी रोहित राजने यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times