१५ ऑगस्टपर्यंत समुद्रात मासेमारीला बंदी मच्छीमारांच्या सुरक्षेसह माशांच्या प्रजननाला चालना; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
श्रीवर्धन ( रामचंद्र घोडमोडे) :- राज्यातील सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला पोषक वातावरण निर्माण करणे आणि मान्सून काळात मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यंदा १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारच्या समुद्री मासेमारीस पूर्ण बंदी लागू राहणार आहे.
यापूर्वी ही बंदी दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत लागू असायची. मात्र, समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे दीर्घकालीन संरक्षण, सागरी जैवविविधतेचे संवर्धन आणि बदलत्या हवामानाचा विचार करून शासनाने बंदीचा कालावधी १५ दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मत्स्यतज्ज्ञांच्या मते, पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. या काळात मासेमारीवर निर्बंध असल्याने माशांना अंडी घालण्यासाठी आणि नैसर्गिकरीत्या वंशवृद्धी करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळते. परिणामी, भविष्यात मत्स्यसंपदा वाढण्यास आणि मच्छीमारांना अधिक शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.
दुसरीकडे, मान्सूनच्या काळात समुद्रात उंच लाटा, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मासेमारी करणे धोकादायक ठरते. अनेकदा अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडत असल्याने मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ही वाढीव बंदी महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेषतः बाहेरील राज्यांतील मासेमारी नौकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व मच्छीमार बांधवांना आणि नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. "मत्स्यसंपदा जतन करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आजचे संवर्धनच उद्याच्या समृद्ध सागरी संपत्तीची हमी ठरेल," असे विभागाने स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times