ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

ट्रक उलटून चालक गंभीर जखमी.

तारणे येथील धोकादायक वळणावर अपघाताची मालिका सुरूच.

तळा (श्रीकांत नांदगावकर) :- तळा शहराजवळील ‘तारणेची डाग’ (वळण) आता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे. गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास या तीव्र उतरत्या वळणावर पुन्हा एक थरकाप उडवणारी घटना घडली. एक अवाढव्य ट्रक या धोकादायक वळणावर उलटला असून चालक ट्रकमध्येच अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चालक मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आहे. या अपघातानंतर “कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पापांचे आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
*तांत्रिक चुकांमुळे वर्षभरात ४ मोठे अपघात.
इंदापूर ते आगरदांडा या महामार्गावर अशी अनेक भयानक वळणे आहेत जी अपघातांना आमंत्रण देत आहेत. तारणेच्या याच वळणावर वर्षभरात चार मोठे अपघात घडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद केवळ ‘अपघात’ म्हणून केली जाते. परंतु, या अपघातांचे खरे कारण चालकाची चूक नसून, नव्याने बांधलेला रस्ता आणि त्यावरील धोकादायक वळण हेच असल्याचे उघड झाले आहे.
* रस्ता की अभियंत्यांचा निष्काळजीपणा?
रस्ता तयार करताना संबंधित यंत्रणेने कोणताही तांत्रिक विचार केला नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महामार्गावरील वळणाचा कोन  आणि त्याचा तिरकेपणा  किती असावा, याचा कोणताही अभ्यास न करता हा रस्ता बनवल्याचे वारंवार होणाऱ्या अपघातांवरून स्पष्ट होत आहे. जाणकार चालकांच्या मते, एकाच वळणावर जर वारंवार अपघात होत असतील, तर त्याला केवळ चालक जबाबदार नसून, रस्ता बनवणारे कंत्राटदार आणि संबंधित अभियंतेही  तितकेच जबाबदार आहेत.
* गुन्हे दाखल करा; नागरिकांची आक्रमक मागणी.
शेकडो नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर आणि कामावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
*स्थानिक नागरिकांच्या मुख्य मागण्या.
१. या संपूर्ण रस्त्याचे तातडीने ‘तांत्रिक ऑडिट’ करून दोषींवर कडक कारवाई व्हावी.
२. अपघात रोखण्यासाठी तीव्र उतारापासून समान उंचीचे रबरी स्पीड ब्रेकर बसवावेत.
३. वळणावर रेडियम इंडिकेटर्स, गतिरोधक, धोक्याचे सिग्नल आणि मार्गदर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत.अशा मागण्या करण्यात येत असून वाहतूक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे गांभीर्याने पाहणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघणार? याकडे आता संपूर्ण तळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट