ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

स्मार्ट मीटर त्वरित बंद करा अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन



वाढत्या बिलाने ग्राहक त्रस्त  महावितरणला निवेदन........



पाली (निशांत पवार) :-  सुधागड तालुक्यातील नागरिक महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या कारभाराने पुरते हैराण झाले असून, या विरोधात महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, या स्मार्ट मीटरची प्रक्रिया कायमची बंद करण्याच्या मागणीसाठी मनसेने सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २९) महावितरणच्या पाली विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे, येत्या सात दिवसांत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया न थांबल्यास सुधागड मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
        गेल्या काही दिवसांपासून सुधागड तालुक्यात नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, या नवीन मीटरमुळे वीज बिलात अनपेक्षित आणि अवाढव्य वाढ झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सामान्य ग्राहकांना हजारो रुपयांची बिले येत असल्याने त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या समस्येची दखल घेत तालुक्यातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेकडे धाव घेतली आणि स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या आर्थिक लूट विरोधात आवाज उठवण्याची मागणी केली.
    नागरिकांच्या या मागणीला प्रतिसाद देत, महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेने तातडीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता जाधव साहेबांना भेटून सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीत मोठी त्रुटी असून यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी. जर पुढील सात दिवसांत स्मार्ट मीटर संदर्भातील कोणतीही ठोस कार्यवाही आणि निर्णय न दिसल्यास, सुधागड तालुक्यात मनसेच्या वतीने महावितरण विरोधात तीव्र संघर्ष छेडला जाईल, असा सज्जड दम देण्यात आला. या निवेदनाच्या वेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे, पाली शहर अध्यक्ष दीपेश लहाने, चव्हाण वाडी शाखा अध्यक्ष परेश वनगळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे तालुक्यात स्मार्ट मीटर विरोधातील असंतोष समोर आला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट