स्मार्ट मीटर त्वरित बंद करा अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन
वाढत्या बिलाने ग्राहक त्रस्त महावितरणला निवेदन........
पाली (निशांत पवार) :- सुधागड तालुक्यातील नागरिक महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या कारभाराने पुरते हैराण झाले असून, या विरोधात महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, या स्मार्ट मीटरची प्रक्रिया कायमची बंद करण्याच्या मागणीसाठी मनसेने सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २९) महावितरणच्या पाली विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे, येत्या सात दिवसांत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया न थांबल्यास सुधागड मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुधागड तालुक्यात नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, या नवीन मीटरमुळे वीज बिलात अनपेक्षित आणि अवाढव्य वाढ झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सामान्य ग्राहकांना हजारो रुपयांची बिले येत असल्याने त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या समस्येची दखल घेत तालुक्यातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेकडे धाव घेतली आणि स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या आर्थिक लूट विरोधात आवाज उठवण्याची मागणी केली.
नागरिकांच्या या मागणीला प्रतिसाद देत, महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेने तातडीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता जाधव साहेबांना भेटून सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीत मोठी त्रुटी असून यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी. जर पुढील सात दिवसांत स्मार्ट मीटर संदर्भातील कोणतीही ठोस कार्यवाही आणि निर्णय न दिसल्यास, सुधागड तालुक्यात मनसेच्या वतीने महावितरण विरोधात तीव्र संघर्ष छेडला जाईल, असा सज्जड दम देण्यात आला. या निवेदनाच्या वेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे, पाली शहर अध्यक्ष दीपेश लहाने, चव्हाण वाडी शाखा अध्यक्ष परेश वनगळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे तालुक्यात स्मार्ट मीटर विरोधातील असंतोष समोर आला आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times