ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

श्री दत्तराज कॅरम स्पर्धेत घुफ्रान - मधुरा विजयी

श्री दत्तराज कॅरम स्पर्धेत घुफ्रान - मधुरा विजयी 

                      श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हॉटेल मंगलम, नरसोबा वाडी, कोल्हापूर येथे कै अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर पुण्याच्या रहिम खानचा २५-०, २५-१५ असा सहज धुव्वा उडवत विजेतेपदाला गवसण घातली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या विकास धारियाने पुण्याच्या अभिजीत त्रिपणकरचा तीन सेटनंतर २०-११, ३-२५ व १८-१३ असा पराभव केला. 
महिला एकेरीचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. यात ठाण्याच्या मधुरा देवळेने पालघरच्या श्रुती सोनवणेचा १८-२१, २२-८ व २५-४ असा पराभव करत आपले पहिले विजेतेपद पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या ऐशा साजिद खानने मुंबईच्या मैत्रेयी गोगटेवर रंगतदार लढतीत १८-१५, १८-२२ व २२-८ असा विजय मिळवला. स्पर्धेत एकंदर ६ व्हाईट स्लॅम व २ ब्लॅक स्लॅमची नोंद करण्यात आली. 
                     विजेत्यांना प्रमुख पाहुणे श्री प्रशांत शहापूरे ( कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य ), फझल अली पाटील ( शिरोळ पंचायत समिती सदस्य ), श्री हर्षद पुजारी ( श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष ), भालचंद्र पुजारी ( स्पर्धा आयोजक ), श्री अवधूत पुजारी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थित पारितोषिक वितरण सोहळा संपन्न  झाला.

पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल.
रहिम खान ( पुणे ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) १८-१७, २५-१२
महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि अभिजीत त्रिपनकर ( पुणे ) २५-१२, २५-०
 
महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल. 
मधुरा देवळे ( ठाणे ) वि वि मैत्रेयी गोगटे ( मुंबई ) २३-९, २५-९
श्रुती सोनावणे ( पालघर ) वि वि ऐशा साजिद खान ( मुंबई ) २१-६, १७-३

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट