मिसिंग लिंक टनेलमध्ये दरड कोसळली १८ तासांच्या प्रयत्नानंतर मुंबई लेन अंशतः सुरू
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या मुंबई लेनवरील टनेल क्रमांक २ मध्ये सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पावसाच्या पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की दरडीसोबत टनेलच्या आरसीसी कमानीचाही काही भाग कोसळला. या घटनेनंतर पहाटे चार वाजल्यापासून मुंबईकडे जाणारी लेन तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.
घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव व दुरुस्तीचे काम हाती घेतले. सलग सुमारे १८ तासांच्या प्रयत्नांनंतर मुंबई लेनवरील दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या. मात्र ज्या लेनवर अद्यापही पावसाचे पाणी झिरपत आहे, ती लेन सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प उभारण्यात आल्याने कितीही मुसळधार पाऊस किंवा वादळी वारे आले तरी या प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात टनेलमध्ये दरड कोसळल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वीही याच टनेल परिसरात वरून दगडाचा छोटा तुकडा एका प्रवासी वाहनावर पडून त्याच्या काचेचे नुकसान झाले होते. त्या वेळीही मोठा अपघात थोडक्यात टळला होता.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे मिसिंग लिंकमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरडीची टांगती तलबार डोक्यावर ठेवूनच प्रवाशांना प्रवास करावा लागणार का? असा सवाल आता वाहनचालक आणि प्रवासी उपस्थित करत आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times