ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मिसिंग लिंक टनेलमध्ये दरड कोसळली १८ तासांच्या प्रयत्नानंतर मुंबई लेन अंशतः सुरू


प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई :-  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या मुंबई लेनवरील टनेल क्रमांक २ मध्ये सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पावसाच्या पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की दरडीसोबत टनेलच्या आरसीसी कमानीचाही काही भाग कोसळला. या घटनेनंतर पहाटे चार वाजल्यापासून मुंबईकडे जाणारी लेन तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.

घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव व दुरुस्तीचे काम हाती घेतले. सलग सुमारे १८ तासांच्या प्रयत्नांनंतर मुंबई लेनवरील दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या. मात्र ज्या लेनवर अद्यापही पावसाचे पाणी झिरपत आहे, ती लेन सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प उभारण्यात आल्याने कितीही मुसळधार पाऊस किंवा वादळी वारे आले तरी या प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात टनेलमध्ये दरड कोसळल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापूर्वीही याच टनेल परिसरात वरून दगडाचा छोटा तुकडा एका प्रवासी वाहनावर पडून त्याच्या काचेचे नुकसान झाले होते. त्या वेळीही मोठा अपघात थोडक्यात टळला होता.

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे मिसिंग लिंकमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरडीची टांगती तलबार डोक्यावर ठेवूनच प्रवाशांना प्रवास करावा लागणार का? असा सवाल आता वाहनचालक आणि प्रवासी उपस्थित करत आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट