म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन
- by
- Jul 10, 2026
म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा व तात्काळ निर्णय
मुंबई, दि. ०९ जुलै, २०२६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार दिनांक १३ जुलै, २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून 'म्हाडा'च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
म्हाडा प्रशासनाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून घ्यावे. आजतागायत म्हाडामध्ये १८ लोकशाही दिन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकार्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रती संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रत्येक लोकशाही दिन कार्यक्रमापूर्वी श्री. जयस्वाल यांच्याकडून यापूर्वी झालेल्या लोकशाही दिनातील प्रकरणांवर अधिकार्यांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा देखील आढावा घेण्यात येतो. यामुळेच तसेच लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरत आहे.
म्हाडा प्रशासनाद्वारे कळविण्यात येत आहे की, लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रार अर्ज विहित नमुन्यात असावा. म्हाडा लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस अगोदर २ प्रतींत पाठविणे आवश्यक राहील. सदर नमूना अर्ज म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर नागरिकांसाठी या अंतर्गत लोकशाही दिन या सदरात उपलब्ध आहे. अर्जदाराची तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसतील असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठवण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास देखील पाठविण्यात येईल.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.