न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

परदेशात नोकरीच्या आमिषाने 16 तरूणांची फसवणूक

नवी मुंबई ः रशिया व थायलंडमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघा भामट्यांनी अनेक बेरोजगार तरुणांकडून लाखोंची रक्कम उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवनीत सिंग, मनदीप सिंग आणि हिरा सिंग असे या त्रिकुटाचे नाव असून गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. फसवणूक झालेल्या 16 तरुणांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रारी केल्या असल्या तरी या भामट्यांनी अनेक तरुणांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आरोपी त्रिकुटाने खारघर सेक्टर 3मधील युगंधा कॉम्प्लेक्समध्ये आयसीएस टेक्नॉलॉजीज या नावाने कार्यालय थाटले होते. त्यानंतर या त्रिकुटाने रशिया व थायलंड देशामध्ये फर्निचर, प्लंबर, इलेक्ट्रिक व अन्य कामांसाठी मुले पाहिजे असल्याची जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे विविध भागांत रहाणारे फर्निचर, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक, वेल्डिंग तसेच अन्य प्रकारची कामे करणार्‍या तरुणांनी मे महिन्यामध्ये खारघर येथील कार्यालयात संपर्क साधला होता. त्यावेळी या त्रिकुटाने महिन्याला 50 हजार रुपये पगार मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्रिकुटाने प्रत्येक तरुणाची मुलाखत घेण्याचा तसेच त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा बहाणा करून त्यांना परदेशात जाण्यासाठी लागणारा व्हिसा मिळविण्यासाठी रोख रक्कम लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून 10 हजारांपासून ते 50 हजारांपर्यंतची रक्कम उकळली. त्यानंतर या त्रिकुटाने त्यांना बनावट व्हिसा दिला. काही तरुणांनी इंटरनेटच्या माध्यमातून या व्हिसाची तपासणी केली असता, हा व्हिसा बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खारघर येथील कार्यालयात जाऊन विचारणा केली. यावेळी त्रिकुटाने उर्वरित 40 हजार रुपये आल्यानंतरच त्यांना खरा व्हिसा देण्यात येणार असल्याचे तसेच त्यांना लवकरच परदेशात कामाला पाठविणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र दोन दिवसांनंतर हे तरुण पुन्हा खारघर येथील कार्यालयात गेले असता, तिघांनी कार्यालय बंद करून पलायन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांनी गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट