*जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘घरोघरी तिरंगा–घरोघरी स्वच्छता’ अभियानांतर्गत विशेष मोहीमा*
- by
- Aug 10, 2026
नवी मुंबई : ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त मोहीमा राबविण्यात येत असून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘घरोघरी तिरंगा – घरोघरी स्वच्छता’ अभियानांतर्गत दिघा आणि घणसोली विभागात विशेष स्वच्छता व आरोग्य तपासणी मोहीमा राबविण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार पावसाळी कालावधीत स्वच्छतेचे आणि आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन या दोन्ही विभागांनी एकत्रितपणे संयुक्त मोहीमा राबविण्यास सुरूवात केलेली आहे. या अंतर्गत विविध भागांतील दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे व अशी ठिकाणे निवडून विभागीय स्वच्छता कर्मचारी आणि त्या क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राचे साथरोग नियंत्रक व मूषक नियंत्रण कार्यवाही करणारे कर्मचारी संयुक्तपणे स्वच्छता व आरोग्यविषयक कार्यवाही करीत आहेत. त्याचप्रमाणे सोसायट्या, वसाहती याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील रहिवाशांमध्ये कच-याचे 4 प्रकारे वर्गीकरण करण्याविषयी जनजागृती करीत आहेत.
या अनुषंगाने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दिघा विभाग कार्यालयाशेजारील रिकाम्या दुर्लक्षित परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे कन्हैय्यानगर भागातही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंचशीलनगर कातकरीपाडा भागातही मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
याशिवाय घणसोली विभागात घणसोली रेल्वे स्टेशन परिसर साफ करण्यात आला. तसेच सेक्टर 25 नोसिलनाका परिसरातील वखार लाईन परिसरातही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच सेक्टर 4 जुन्या पोलीस चौकीमागील अडगळीची जागाही स्वच्छ करण्यात आली. सेक्टर 12 कोपरखैरणे येथेही सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये काही नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या भागातील नागरिकांना कच-याचे 4 प्रकारे वर्गीकरण करण्याविषयी माहिती देण्यात आली व त्याची अंमलबजावणी सुरू करावी असे सांगण्यात आले.
या स्वच्छता मोहीमेसोबतच आरोग्य विभागाच्या वतीने मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमही राबविण्यात आली. यामध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याने पाणी साचून राहण्याची शक्यता आहे असे उघड्यावर पडलेले साहित्य जमा करण्यात आले. बैठ्या घरांच्या छतावर पावसाळ्यात प्लास्टिक टाकलेले आहे अशा ठिकाणी पाणी साचून डासांच्या अळ्यांची निर्मिती झाली नाही याविषयी तपासणी करण्यात आली. काही भागांमध्ये डास प्रतिबंधात्मक धुरीकरण करण्यात आले.
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडे प्राप्त तक्रारीस अनुसरून ऑलीव गृहनिर्माण संस्था, सेक्टर 27, नेरूळ येथील आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देऊन डास प्रतिबंधात्मक पाहणी केली व फवारणी केली आणि नागरिकांना पाणी साचू न देण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली संयुक्तपणे या विशेष सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून नागरिकांचाही या मोहीमांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी घरात व घराभोवताली पाणी साचून राहिल्यास होणारी डासउत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घ्यावी व पावसाळी कालावधीत साथरोगांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तापसदृश्य स्थिती असल्यास तत्परतेने महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात वा डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times