वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

वनहक्काचे प्रलंबित पट्टे १५ दिवसांत देण्यासाठी पाठपुरावा करणार : खासदार सुनील तटकरे

  • by
  • Aug 10, 2026


सुधागडमधील आदिवासी प्रश्नांसाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेणार; आदिवासी भवनातून ३६५ दिवस विकासाचे काम करण्याचा संकल्प

पाली :  जागतिक आदिवासी दिन हा केवळ एका दिवसाच्या उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, आदिवासी समाजाच्या शिक्षण, रोजगार, हक्क आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी वर्षभर काम झाले पाहिजे. सुधागड तालुक्यात वनहक्क कायद्यांतर्गत पात्र असूनही प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नावासह यादी उपलब्ध करून दिल्यास, येत्या १५ दिवसांत त्यांना वनहक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठी खासदार म्हणून प्रत्यक्ष पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
​जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार तटकरे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले. १५ ऑगस्टनंतर पालीत विशेष संयुक्त बैठक सुधागड तालुक्यातील आदिवासींच्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी १५ ऑगस्टनंतर पाली येथे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, वनविभाग, प्रकल्प अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्याची घोषणा खासदार तटकरे यांनी केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करावी, जेणेकरून या बैठकीत ठोस निर्णय घेऊन कार्यवाहीला गती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
​आदिवासी भवन ठरणार विकासाचे केंद्र सुधागडमध्ये उभारण्यात येणारे आदिवासी भवन केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता, ३६५ दिवस समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहिले पाहिजे, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.  या भवनात करिअर मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका व ग्रंथालय स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास प्रशिक्षण क्रीडा व कला क्षेत्राला प्रोत्साहन देणारे उपक्रम ​सुरू करून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जाईल. शिक्षणाने बदलतंय चित्र आणि संस्कृतीचे जतन स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मा नाग्या माधव कातकरी आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या योगदानाचा गौरव करत तटकरे म्हणाले की, "पूर्वी स्थलांतर करणारा आदिवासी समाज आता शिक्षणाबाबत जागृत झाला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांत आदिवासी तरुण यश मिळवत आहेत." तसेच वारली चित्रकला आणि पारंपरिक कला टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करण्यावर भर देत, २०२७ च्या जागतिक आदिवासी दिनाला पुन्हा उपस्थित राहून वर्षभरात झालेल्या कामांचा, मिळालेल्या पट्ट्यांचा आणि योजनांच्या लाभाचा लेखाजोखा (रिपोर्ट कार्ड) जनतेसमोर मांडणार असल्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर जैन यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण व उच्च शिक्षणाकरिता स्वतंत्र वसतिगृहाची गरज व्यक्त केली. खासदार सुनील तटकरे यांच्या अभ्यासू नेतृत्वाखाली केंद्र व राज्याच्या योजना सुधागडमधील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक 'माध्यम' म्हणून काम करू, असे आश्वासन जैन यांनी दिले. तसेच वसतिगृहासाठी स्वतःच्या संस्थेमार्फत सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, माजी जि. प. सदस्य किशोर जैन, आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, उपसभापती संदेश शेवाळे, चंद्रकांत वारगुडा, सुलतान बेनसेकर, सुधीर भालेराव, आशिक मणियार, प्रकाश कारखानीस, साक्षी दिघे, सुनील राऊत, ग. रा. म्हात्रे, मयुर कारखानीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट