वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी

  • by
  • Aug 14, 2026

पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेम (GeM) च्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राने दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ‘जेम ग्रासरूट्स प्रोक्युरमेंट एक्सलन्स अवॉर्ड’ आणि ‘हायेस्ट जेम प्रोक्युरमेंट व्हॅल्यू सिन्स इन्सेप्शन – ब्रॉन्झ अवॉर्ड’ या दोन पुरस्कारांनी महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राज्याच्या वतीने हे पुरस्कार स्वीकारले. उद्योग संचालनालयाच्या सहसंचालक विजू सिरसाठ यावेळी उपस्थित होत्या.

ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेमच्या माध्यमातून सार्वजनिक खरेदीला प्रोत्साहन देणे, तसेच खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची दखल ‘जेम ग्रासरूट्स प्रोक्युरमेंट एक्सलन्स अवॉर्ड’द्वारे घेण्यात आली आहे. तर जेमच्या स्थापनेपासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या खरेदीमूल्यासाठी राज्याला कांस्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रात जेमच्या प्रभावी वापरासाठी उद्योग विभाग नोडल विभाग म्हणून कार्यरत आहे. राज्यातील शासकीय विभाग, सार्वजनिक उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेमचा वापर वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. महाराष्ट्र शासन आणि जेम यांच्यात २०१७ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर राज्यभर जेमचा वापर मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.

३१ मार्च २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील विविध संस्थांनी जेमवर ५ लाख ८० हजारांहून अधिक खरेदी आदेश नोंदवले असून, त्यांचे एकूण मूल्य २८,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यापैकी ६० टक्क्यांहून अधिक म्हणजेच १८,८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या खरेदीचा लाभ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), स्टार्टअप्स आणि महिला उद्योजकांना मिळाला आहे.

पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक खरेदी व्यवस्थेसाठी मिळालेला हा राष्ट्रीय गौरव महाराष्ट्राच्या डिजिटल प्रशासन आणि ई-गव्हर्नन्सच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देणारा ठरला आहे. पंचायतस्तरापासून राज्यस्तरापर्यंत जेमच्या प्रभावी वापरामुळे सार्वजनिक खरेदी व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यासोबतच स्थानिक उद्योजक आणि छोट्या व्यवसायांना सरकारी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट