स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हाडा मुख्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा उत्साहात म्हाडाच्या ‘परिसर परिचय’ स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे विमोचन; अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या देशभक्तीपर गीतांनी सोहळा उत्साहात साजरा
- by
- Aug 15, 2026
मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
ध्वजारोहणानंतर खेरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथक तसेच म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरीत्या राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्यगीताचे गायन केले. या सोहळ्यास म्हाडाच्या विविध मंडळांतील वरिष्ठ अधिकारी, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करण्यात आले. तसेच राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीप्रती कटिबद्धतेचा संदेश देण्यात आला.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे म्हाडाचे मुखपत्र ‘परिसर परिचय’च्या स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे विमोचन. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकामध्ये गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विविध विषयांसह म्हाडाच्या विकासात्मक, लोकाभिमुख आणि नागरिककेंद्री उपक्रमांचा वेध घेण्यात आला आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर, महाराष्ट्र गलिच्छ वस्ती न्यायाधिकरणाचे अध्यक्ष श्री. भगवान चिकने, म्हाडाचे मुख्य अभियंता श्री. धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता श्री. अनिल अंकलगी, सचिव श्री. प्रफुल्ल ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल वानखडे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सतीश भारतीय, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विशाल राठोड, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. उमेश वाघ, उपमुख्य अभियंता श्री. किशोर काटवटे व श्री. भूषण देसाई, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले, दक्षता व सुरक्षा अधिकारी श्री. महेश चव्हाण आदींसह म्हाडातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि लोकसेवेप्रती नव्या संकल्पाच्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times