When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५७४ पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास प्रारंभ

  • by
  • Sep 11, 2026

   मुंबई, दि. १० सप्टेंबर, २०२६ :- वरळी बीडीडी चाळ या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील विंग बी आणि सी विंग मधील एकूण ५७४ पात्र रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास आजपासून वरळीतील सुमेर केंद्र इमारतीच्या म्हाडा प्रकल्प कार्यालयात प्रारंभ करण्यात आला.     

        वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील 'बी' आणि 'सी' या विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून सदर विंगमधील एकूण ५७४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मंडळातर्फे सुरू करण्यात आले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०६.०० वाजता सार्वजनिक सुट्टी सोडून सदर वितरण पत्र व ताबा पत्रांचे वाटप केले जाणार आहे. वितरण पत्र/ ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकीत प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (रु. ५००/- च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट साईजचे ३ नविन रंगीत फोटो, पुनर्वसित सदनिकेमध्ये सोबत वास्तव्य करणा-या कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो (पोस्टकार्ड साईज) या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. 


     तसेच मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, निवासी सदनिकांचे वितरण विंग सी आणि बी या क्रमाने करण्यात येणार आहे.  वितरण पत्र स्किारणेबाबतचे वेळापत्रक वरील नमूद ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. सदनिकाधारकांनी वेळापत्रकानुसार संबंधित ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सदनिकेचे वितरण पत्र स्विकारावे व त्यानंतर सदनिकेचा ताबा घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. 

        वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे पात्र रहिवाशांना दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच पुनर्वसन इमारत क्र. १ मधील 'एफ', 'जी' व 'एच' विंग मधील ८२७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण दि. २१ मे, २०२६ पासून सुरू करण्यात आले. ज्याप्रमाणे इमारतींचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहे त्यानुसार भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुनर्वसन सदनिकांचा ताबा दिला जात आहे.   

       आशियातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा ठरलेला १९२ एकरवरील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, ना. म. जोशी मार्ग- परळ तसेच नायगाव येथील बी डी डी चाळींचा समावेश आहे.          

       वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १२१ जुन्या चाळींतील ९ हजार ६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एकूण भूखंडापैकी ६५ टक्के जागेचा पुनर्वसनासाठी वापर करण्यात आला आहे. १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहे. स्टील्ट + पार्ट सहा मजली पोडियम पार्किंगमध्ये प्रत्येक सदनिकाधारकास एकास एक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरण पूरक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, ग्रेनाइट ओटा, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकचा ओट्टा,  ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक  सुविधा देण्यात आल्या असून इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, तीन लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट, १ फायर लिफ्ट देण्यात आली आहे. 

        वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र व्यापारी संकुल शाळा, व्यायामशाळा, रुग्णालय, वसतिगृह आदी सुविधांचे नियोजन असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. वरळी प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींची 'म्हाडा'तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार असून मुंबईच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार जांबोरी मैदान व आंबेडकर मैदानाचे जतन केले जाणार आहे. चाळीतील जुन्या इमारतीचे 'जैसे थे' जतन करुन म्हाडातर्फे संग्रहालय बनविण्यात येणार आहे. या माध्यमातून बीडीडी चाळींची माहिती व वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असून भावी पिढीला याद्वारे बीडीडी चाळींच्या इतिहासाबाबत माहिती उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे.


रिपोर्टर

  • Anoop chandrakant chavan
    Anoop chandrakant chavan (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Anoop chandrakant chavan

संबंधित पोस्ट