पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती द्या
राज्यमंत्री बबनराव लोणीकर निर्देश
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी लोणीकर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइन जुन्या झाल्या असल्याने, पाणीगळतीचे प्रमाण वाढले आहे. गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी एका महिन्याच्या आत प्रयत्न केले जातील. पाणीपुरवठा योजनांना होणारा खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानगरपालिकेच्या हद्दीत वेळीच व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा क्र मांक -3 तयार करण्यात आली असून, योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या वेळी आ.प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल, पनवेल म.न.पा.चे सभागृहनेते परेश ठाकूर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, पनवेल महानगरपालिकेचे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आराखडे तयार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमृत योजनेतून सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावांच्या शहरी निकषाप्रमाणे दरडोई 135 लिटर/दिन/माणसी या प्रमाणे सेवास्तर उंचविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्यात आले आहेत. ते नगर विकास विभागाला पाठविण्याच्या सूचनाही या वेळी लोणीकर यांनी दिल्या.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times