न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महिलेची गोळी झाडून हत्या

नवी मुंबई : बँकेत गेलेल्या पतीची वाट पाहत कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत (50) यांची अज्ञात मारेकर्‍याने कारसह अपहरण करुन हत्या केली. भरदुपारी उलवे परिसरात गोळी झाडून त्यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येच्या घटनेनंतर प्रभावती भगत यांच्याजवळ असलेले दागिने लुटले गेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रभावती भगत यांना मारण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

उरणच्या शेलघर भागात रहाणारे बाळकृष्ण भगत हे सोमवारी दुपारी आपली पत्नी प्रभावती भगत यांच्यासह कारने उलवे सेक्टर-19 मधील बँक ऑफ महाराष्ट्र येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी बाळकृष्ण भगत यांनी आपली कार बँक समोरच उभी करुन पत्नी प्रभावती यांना कारमध्ये बसवून ते एकेटच बँकेत गेले होते. यावेळी बाळकृष्ण यांनी कारची एसी सुरु रहावी यासाठी कार सुरुच ठेवली होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने अचनाक त्यांच्या कारमध्ये प्रवेश केला. भगत यांची कार वहाळच्या दिशेने पळवून नेली. यावेळी मारेकर्‍यासोबत प्रभावती यांची झटापट झाल्याने मारेकर्‍याने आपल्याकडील रिव्हॉल्वरने प्रभावती भगत यांच्या छातीवर एक गोळी झाडली. 

 त्यानंतर त्याने कार वहाळ गावाजवळील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस सोडून पलायन केले. दरम्यान बाळकृष्ण जेव्हा एटीमच्या बाहेर आले तेव्हा त्यांची गाडी आढळून न आल्याने त्यांनी मुलास बोलावून घेतले. त्यांचा मुलगा आल्यावर शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी गाडी ज्या दिशेने गेली ते सांगितल्यावर त्या दिशेने जात गाडीची शोधाशोध सुरू करण्यात आली. तोवर भगत यांच्या परिचितांनी गाडीचा शोध घेतला. त्यात कार एटीएम केंद्रापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर सापडली. मात्र त्यात प्रभावती या जखमी अवस्थेत होत्या त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल  करण्यात आले, मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख  गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी  इमारतीवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट