सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महाराष्ट्र प्रवेशासाठी नवी नियमावली

25 नोव्हेंबरपासून होणार लागू ; आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना करत असून ठोस निर्णय घेत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्याची येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या अंतर्गत दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ही टेस्ट निगेटीव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. 

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत हळूहळू वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून राज्य सरकारही खबरदारीचे उपाय करत आहे. महाराष्ट्राची वाटचाल दिल्लीच्या दिशेने होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जावू नये, याकरता मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग, टेस्टिंगवर भर दिला जात आहे. तसंच मास्क न वापरणार्‍यांविरोधातही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आता मुंबईतल्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचीही कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. विमान, ट्रेन व रस्त्याने महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍या प्रवाशांसाठी, महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचना 25 नोव्हेंबरपासून लागू होतील. यामध्ये या अंतर्गत दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणार्‍या विमान, टे्रन व रस्ता मार्गाने येणार्‍या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ही टेस्ट निगेटीव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर उपचारासाठी सीसीसी मध्ये पाठवण्यात येणार आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारला दोन दिवसांत कोरोनाबाबतच्या तयारीचा अहवाल देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. गुजरात, दिल्ली, महाराष्ट्रातली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे का ? असा सवाल कोर्टाने विचारला. कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे असं कोर्टाने खडावलं आहे. अहवाल आल्यावर पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट