"वादळी वाऱ्याने पत्रे उडून भिंत कोसळली; सहा जणांचा मृत्यू"
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात धक्कादायक घटना धड़ली आहे. मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेनं सांगली जिल्ह्यावर शोककला पसरली आहे.
मृतांची नावे
- शंकर आबा लोखंडे पाडोझरी
- मंगल भाऊसा मोठे पांडोजरी
- संजुबाई राम चौधरी पांडोजरी
- कोंडीबा गेजगे दरीबडची
- तर आणखी दोन भविकांचा मृत्यू झाला आहे, असे एकूण सहा भविकांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळत आहे. अनेक भाविक जखमी झाले आहेत .
वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील मोटेवाडी ये मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. भाविकांची मोठी गर्दी होती वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे भाविकांनी शेडच्या भिंतीला आडोसा म्हणून आसरा घेतला पण भिंत चिऱ्याच्या दगडाच्या बांधकामाची होती. चिऱ्याच्या तडाख्यान भिंत कोसळली त्यामध्ये भाविकांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी, इतर १५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जत प्रशासन व पोलिसांची तातडीने धाव घेतली असून त प्रांताधिकारी नष्ठे यांची घटनास्थळी भेट, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. मृतांपैकी तीन जण विजापूर तालुक्यातील व तीन जण जत तालुक्यातील आहेत.
मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा भरल्यामुळं भाविकांची मोठी गर्दी होती
जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पण अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे भितं कोसळल्याची घटना घडल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे. बांधकामावरी पत्रे उडून भिंतीवर पडले त्यामुळे भिंत पडली. यामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० ते २५ भाविक जखमी झाल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे. मंदिराशेजारी शेडचे उभारण्यात आले होते, या शेडसाठी दगडी चिऱ्यांचा वापर करण्यात आला होता. माळरानावर पत्र्याचे शेड उभारण्यात आले असून पावसापासून व जोरदार वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनेक भाविक या भिंतीलगत उभारले होते जोरदार वारे पत्र्यात शिरल्याने कडेला असलेली चिऱ्याची भिंत अचानक कोसळली
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times