Breaking News
ज्याच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध मैलभर पसरलेला असा मी पाहिलेला एक माणूस. जगण्यापालिकडची प्रेरणा देणारा. एका विचारवंताने लिहिले आहे, मन जिंकणे हि एक कला आहे. याच गोष्टीमुळे सहज काही साध्य करता येते. मित्र जोडता येतात. ज्याच्या हातात कर्त्यव्य जाणीवतेचे आणि सामाजिक सेवेचे कंकण बांधलेले आहे. शिवडी विधानसभा क्षेत्रात एक लखलखणारे नांव. ज्या विभागात टोलेजंग टॉवर आहेत त्याच विभागात झोपडपट्ट्या आणि मोडक्या तोडक्या चाळी गजबजलेल्या आहेत. त्या ठिकाणी जमिनीवर राहून लोकांच्या सेवेला वाहून घेतलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष. दुसऱ्याला मदत करताना या हाताचे त्या हाताला कळू द्यायचे नाही हे पथ्य राजकारणात असून पाळणारा आमचा नंदू नावाचा बंधू.... श्री नंदकुमार चिले त्याच्याविषयी काय सांगू...!
आदरणीय श्री राजसाहेब आणि बाळा नांदगावकर यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा, बीज जर एके ठिकाणी गाडून त्याचा वृक्ष कसा होईल, याकडे सूचकतेने लक्ष देताना बीजाला हवेत उडू न देता त्या बीजापासून अंकुर कसा फुटेल आणि एका बीजातून शेकडो फळे कशी निर्माण करण्याची कला अवगत असलेला वल्ली. जबरदस्त संघटन कौशल्य. सैरभैर कार्यकर्त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारा, फुले एकत्र आली तर पुष्पहार गुंफिले जातात. सूर एकत्र येतात तेव्हा संगीत तयार होते.शेकडो हाडे एकत्र येतात तेव्हा हा देह तयार होतो. त्या देहाना एकत्र ठेवून आबश्यक दिशा दर्शवित मराठी भाषेचा पुरस्कर्ता म्हणजे आमचा नंदू नावाचा बंधू.
कोरोना काळात अनेक दिवे मंदावले असताना जवळजवळ अनेक घरात आपल्या सामाजिक सेवेतून लोकांच्या मनात आनंद नांदावा या हेतूने दीप प्रज्वलित कर्त्यव्य जाणीवतेचे केल्याने अनेकजण सुखावले होते. वादळ आले, वादळाच्या तडाख्यात यावेळी चाळीतले आणि झोपडपट्ट्यातले नागरिक देखील वावटळीत सापडले. पडझड झाली. घरावरचे पत्रे उडाले. एकतर कोरोना मुळे आर्थिक संकट आणि त्यात आलेले वादळ. अशा समयी घरावर पत्रे देऊन दिलासा देत गरजूच्या डोळ्यात आनंदाचे सुवर्णक्षण पाहणारा, दुसऱ्यांच्या मनात आत्मीयता निर्माण करणारा, दुसऱ्याची कदर करणारा आणि आपला माणूस म्हणून काळजी घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचा नंदू नावाचा बंधू. मनसैनिक म्हणून नंदू प्रकाशझोतात आला. प्रामाणिक कार्यकर्ता. निष्ठावंत. ज्याच्या वाणीत पाल्हाळ न लावता पारदर्शकता, स्पष्टता जन्मजात चिकटलेली दिसते. नंदूच्या वाट्याला नेहमीच बोचरे काटे आले. अनेक चेहरे मुखवटे धुंडाळले. काही हिरे माणिक मोती लाभले तर काही टोचणारे आणि सलणारे. अशाची दु:ख अंत:करणात उबवित न ठेवता परखड विचार त्यावर सहजतेने नंदू आपल्या स्वभावागुणावर खंत व्यक्त करताना लिहितोय.
मैंने सबसे ज्यादा धोखा
अपनी अच्छाई से खाया है,
सामने वाले को वैसा ही मान
दिया जैसा उसे देखा, लेकिन बाद
मैं पत्ता चला कि यहाँ लोग
रावण से भी ज्यादा चेहेरे लिए फिरते है ..!
पेट्रोल डीझेल भाववाढ झाली महागाईचा आगडोंब उसळला होता. लोक त्रस्त झाली होती. सत्तेत असणारे एकमेकांच्या विरोधात आंदोलन करीत होते.. शिवडी भागात जनतेसाठी नंदू चिलेच्या नेतृत्वाखाली युवकांची तैनात हाती झेंडा घेऊन महागाई कमी करा म्हणून आरोळी देत होती. महागाई आवाक्यात आली नाही. पण रानात वणवा लावण्याचे काम नंदू नावाच्या बंधूने केले होते. त्याचा धूर फार दूरवर पसरला.
नंदूने शिखर काबीज केली नाहीत. आज उद्याचे सांगता येत नाही. करायला काही कुणी हरकत घेणार नाही. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले ओळी आठवतात, ते लिहितात, माझी अवस्था द्रोपदी सारखी झाली आहे. नवरे पांच आहेत पण कर्णाला बघितले की मनात वेगळीच भावना स्पर्श करून जाते. रवींद्रनाथ टागोर स्वत:ला द्रोपदी म्हणताहेत. या नंदू विषयी मला हेच लिहायचे आहे. समाजात गरीब श्रीमंत सर्व आहेत पण कुणा अडीअडचणीत असलेल्या, गरजूला पाहता हृदयात समथिंग होते. मनात हेलकावे निर्माण होत असतील. दुर्बल घटकांना आधार देणे हि जीवनदृष्टी असेल तर विशेषण कसलेही असो. रमून काम करायचे. कामात व्यग्रता ओढ सारे काही... आई वडिलांच्या पुण्याईमुळे विधाता नंदू सारखी माणसं निर्माण करतो म्हणून समाज निर्धास्त असतो. अशा आमच्या नंदू नावाच्या बंधूला घोडपदेव समूह मानाचा मुजरा करीत आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times