आंबेडकरी चळवळीत सम्राटचे मोठे योगदान : आ. संजय केळकर
आंबेडकरी चळवळीत सम्राटचे मोठे योगदान : आ. संजय केळकर
’सम्राटकार’बबन कांबळे यांच्या स्मृतीदिनी प्रतिपादन
ठाणे : आंबेडकरी चळवळीत सम्राटचे मोठे योगदान आहे. सम्राटच्या कार्याविषयी मला माहिती होती. बबन कांबळे साहेबांशी माझे वैयक्तिक संबंध नसले तरी सम्राटमधील बातम्यांमुळे मला सम्राटची महती कळाली होती. केळकर कुटुंबीय आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वीपासून संबंध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायकचा अंक काढण्यासाठी केळकर कुटुंबाने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्यामुळे त्यावेळी ब्राह्मणांनी केळकर कुटुंबियांवर बहिष्कार टाकला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला केळकर कुटुंबियांचा नेहमीच पाठिंबा होता. केळकर कुटुंब हे पुरोगामी विचारसरणीचे आहे, असे प्रतिपादन आ. संजय केळकर यांनी केले. ते सम्राटकार बबन कांबळे यांच्या आठव्या स्मृतिदिन अभिवादन सभेच्या कार्यक्रमात बोलत होते.
नुकताच दै. सम्राटचे झुंझार संपादक दिवंगत बबन कांबळे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन श्री समर्थ सेवक मंडळ सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, रिपाइंचे गौतम सोनवणे, माजी न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, माजी न्यायाधीश यशवंत चवरे, संपादिका निलिमा बबन कांबळे, कुणाल कांबळे व कृपाल कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल वैद्य होते.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल वैद्य म्हणाले की, बबन कांबळे एक झुंझार संपादक होते. ते केवळ अन्यायाविरोधात बातमी देऊन थांबत नव्हते, तर मंत्रालयात जावून त्या बातमीचा पाठपुरावा करणारे संपादक होते. दै. सम्राटचे संपादक बबन कांबळे हे अन्याय करणार्यांच्या विरोधात निव्वळ बंदूक घेऊन उभे नव्हते, तर मशीनगन घेऊन उभे होते. अन्याय करणार्यांचा एक प्रहार झाला, तर दै. सम्राट दहा प्रहार करायचा. तीच परंपरा दै. सम्राटने बबन कांबळे यांच्यानंतर चालू ठेवली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आंबेडकरी चळवळ ही कोणत्याही एका विशिष्ट जाती किंवा धर्माविरुद्ध नसून ती जातीयवाद आणि मनुवादी प्रवृत्ती विरुद्ध आहे. जातीयवादाची प्रवृत्ती कोणत्याही जातीधर्मातील व्यक्तीच असू शकते. स्वतःला बौद्ध म्हणवून घेणारी व्यक्ती ही त्या प्रवृत्तीची असू शकते. त्यामुळे आमचा विरोध कोणत्याही जातीधर्माला नसून अन्यायकारी प्रवृत्तीला आहे.
आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, कांबळे कुटुंबियांशी डावखरे कुटुंबियांचे संबंध पूर्वीपासून आहेत. दिवंगत वसंतराव डावखरे व दिवंगत बबन कांबळे साहेब यांचे राजकारणापलिकडे संबंध होते. माझे आता तेच संबंध कुणाल कांबळे आणि कृपाल कांबळे यांच्याशी आहेत. सम्राटमधील बातम्यांमुळे अनेक वेळा माझे आणि कुणाल कांबळे यांचे मतभेद होतात. परंतु ते मतभेद केवळ वैचारिक पातळीवर असतात. मी भारतीय जनता पार्टीत जरी असलो तरी सम्राटच्या भूमिकेला माझा नेहमीच पाठिंबा असतो.
गौतम सोनवणे म्हणाले की, 1991च्या रिपब्लिकन ऐक्याच्या बातम्या नवाकाळमध्ये असताना बबन कांबळे साहेबांनी दिल्या. यावेळी बबन कांबळे साहेबांनी ऐक्याविषयी नवाकाळमध्ये लेखही लिहिले. त्यांच्या या लिखाणामुळे मी प्रेरित झालो. 1991चे ऐक्य घडवून आणण्यात बबन कांबळे साहेबांच्या लिखाणाचाही मोठा वाटा आहे. माझे आणि बबन कांबळे साहेबांचे शालेय जीवनापासून संबंध आहेत. आमच्या दोघांचे शालेय शिक्षण वरळी येथील बीडीडी चाळीत झाले आहे. दै. सम्राटला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. आमचा पक्ष कार्पोरेट पक्ष नाही. त्यामुळे आम्ही सम्राटला मोठमोठ्या जाहिराती देऊ शकत नाही. परंतु भाजपसारख्या मोठ्या पक्षाला आम्ही सम्राटला जाहिराती देण्याचे नेहमीच सांगत असतो. सम्राटच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष नेहमीच पाठीशी आहे.
सूत्रसंचालन संतोष साखरे यांनी केले. आभार दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांनी मानले. यावेळी साहित्यिक योगीराज बागुल, संदेश उमप, चंद्रशेखर कांबळे, माधुरी चंद्रशेखर कांबळे, धर्मा ब्राम्हणे, प्रशांत मोरे, अश्विन वाघ, विवेकानंद निकाळे, विद्याधर वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंध कवी भगवान धेंडे यांनी दै. सम्राटवर लिहिलेली कविता गाऊन दाखविली. यावेळी माधुरी चंद्रशेखर कांबळे यांच्यातर्फे 10 हजार रूपये, पुष्पा धाकतोडे यांच्याकरून 5 हजार रूपये, मिनल बच्छाव यांच्याकडून 3 हजार 500 रूपये सम्राटला देणगी देण्यात आली.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble