‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची विजयी हॅटट्रिक

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची विजयी हॅटट्रिक

बदलापूर :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरने विजयी हॅटट्रिकसह उपांत्‍य फेरीत मजल मारली आहे. 

बदलापूर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्‍या राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेला तिसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद लाभला. विदयुत प्रकाशझोतात रंगलेल्‍या स्‍पर्धेत २१ वर्षांखालील मुलीच्‍या गटात मुंबईने सलग तिसरा विजय संपादन केला. शेवटच्‍या साखळी लढतीत मुंबईने लातूर विभागाचा २५-१४, २५-११ गुणांनी पराभव करीत आपले वर्चस्‍व प्रस्‍थापित केले.  उपांत्‍य फेरीत गटात अव्‍वल ठरलेल्‍या मुंबईची नागपूरशी लढत रंगणार आहे. या गटातील दुसरी उपांत्‍य लढत  नाशिक विरूध्द पुणे विभागात होईल. गतविजेत्‍या नाशिक संघानेही ३ सामने जिंकून विजेतेपदाचे दावेदार असल्‍याचे दाखवून दिले आहे. 

२१ वर्षांखालील मुलाच्‍या गटात गतविजेत्‍या लातूरने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली आहे. कोल्‍हापूर, संभाजीनगर पाठोपाठ अमरावतीला लोळवून लातूर गटात अव्‍वल ठरला. अटीतटीच्‍या तिसऱ्या साखळी सामन्‍यात लातूरने अमरावतीला २५-२०, २५-२१ गुणांनी पराभव करीत आव्‍हाप संपुष्टात आणले. लातूरकडून शेहराज शेख, आफताब कुरेशी, निर्भय देशमुख यांनी आक्रमक खेळ करीत मैदान गाजवले. लातूरची उपांत्‍य फेरीत नागपूर विरूध्द आमनासामना होईल. 

मुलांच्‍या १८ वर्षांखालील गटात नागपूरने मुंबईला तिसऱ्या सेटपर्यंत रंगलेल्‍या लढतीत बाजी मारली. तिसऱ्या साखळी लढतीत पहिला सेट नागपूरने गमवला होता. दुसऱ्या सेटमध्ये तुफानी खेळ करीत विजय खेचून आणला. २४-२५, २५-२१, १५-१० गुणांनी नागपूरने मुंबईचे उपांत्‍य फेरीतील स्‍वप्‍न धुळीस मिळवले. वत्‍सल्‍य किरटकर, कृष्णा तडसे यांच्‍या स्‍मॅशेसच्‍या जोरावर नागपूरने विजयी हॅटट्रिकचा पल्‍ला सर केला. उपांत्‍य फेरीत नागपूरची पुणे विरूध्द झुंज होईल. 

मुलीच्‍या १८ वर्षांखालील गटात पुणे संघाने गटात अव्‍वल स्‍थान  प्राप्‍त केले. तिसऱ्या साखळी लढतीत नागपूरचा २५-११, २५-७ गुणांनी धुव्‍वा उडवित उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे. पुणे संघातील साक्षी साळुंखे, वैष्णवी अडलिंगे हीने लक्षवेधी खेळ करीत नागपूरला पराभूत केले.  गतविजेत्‍या लातूर संघाने  १८ वर्षांखालील मुलींच्‍या गटात पराभवानंतर तिसरा साखळी सामना जिंकत उपांत्‍य फेरीचा पल्‍ला पार केला. उपांत्‍य फेरीत पुणे विरूध्द लातूर ही एक चुरशीची लढत रंगणार आहे. 


उपांत्‍य लढती

२१ वर्षांखालील मुले  1)लातूर विरुद्ध नागपूर , २. मुंबई विरुद्ध कोल्हापूर 

२१ वर्षांखालील मुली  १. नाशिक विरुद्ध पुणे, २. मुंबई विरुद्ध नागपूर 

१८ वर्षांखालील मुले  १. लातूर विरुद्ध कोल्हापूर , २. नागपुर विरुद्ध पुणे 

१८ वर्षांखालील मुली १. पुणे विरुद्ध लातूर, २. कोल्हापूर विरुद्ध नागपूर


अंतिम लढतीसाठी २३ लाखांची रोख बक्षिसे

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्‍या अंतिम थरारासाठी बदलापूर नगरी सज्‍ज झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते बक्षीस समारंभ रविवारी संध्याकाळी होणार आहे. स्‍पर्धेतील विजेत्‍यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे. साखळी स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील विजयी व पराभूत संघ, उपांत्य फेरीतील प्रत्येक विजयी व पराभूत संघ, अंतिम फेरीतील विजयी संघ व अंतिम फेरीतील उपविजयी संघाला रोख बक्षिसे दिली जाणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट