‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मुंताजीर ठरला मुंबई महापौर केसरी गदेचा मानकरी

मुंताजीर ठरला मुंबई महापौर केसरी गदेचा मानकरी

३२ वी मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 

मुंबई : आपला चेला मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत बाजी मारणारच हा त्याच्या वस्तादाना आत्मविश्वास होताच.   मग काय आपल्या वस्तादांचा विश्वास सार्थ ठरवताना धाराशिवच्या मुंताजीर सरनौबतने इम्रान मुजावरला चितपट करत ३२ व्या मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेच्या गदेवर आपल्या नावाची मोहर उमटवली.  या यशाबद्दल मुंतजीरला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघाने ३२ व्या मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा केल्यावर  माटुंग्याला लालबहादुर शास्त्री शाळेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद नामदेव बडरे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने मुंताजीरची प्रवेशिका दिली होती. मुंताजीरनेही आपल्या वस्तादांचा विश्वास सार्थ ठरवताना अवघ्या दिड मिनिटात इम्रान मुजावरला चितपट करत मुंबई महापौर केसरी किताब आपल्या नावे केला. मुंताजिर आणि इम्रान यांच्यातली कुस्ती तुल्यबळ होईल अशी अपेक्षा होती. दोघांनीही आक्रमक सुरुवात केली होती. यंदाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेता असलेल्या मुंताजीरने संधी मिळताच झाली डाव इम्रानला चितपट केले. 

कुमार केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या हर्षवर्धन जाधवने ठाण्याच्या जय भोईरला १०-४ अशा गुणफरकाने पराभूत केले. एकतर्फी ठरलेल्या लढतीत हर्षवर्धनने दुहेरीपट, बगालडूख आणि भारंदाज डाव टाकत जयच्या प्रतिकारातील हवाच काढून टाकली होती.

अन्य लढतीत ६२ किलो गटात जयदीप बडरेने लकी खरातवर अंतिम विजय मिळवला. ७२ किलो गटात यश ढाकणेने प्रकाश माळीला पराभूत केले. विजेत्यांना मुंबई शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष विठ्ठल भोसले, शशिकांत देशमुख, सचिव प्रकाश तानवडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट