मध्य रेल्वे वि. रचना नोटरी वर्क्स व पश्चिम रेल्वे वि. महाराष्ट्र पोस्ट यांच्यात रंगणार उपांत्य फेरीचा थरार
‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त रंगल्या उपउपांत्य लढती
मध्य रेल्वे वि. रचना नोटरी वर्क्स व पश्चिम रेल्वे वि. महाराष्ट्र पोस्ट यांच्यात रंगणार उपांत्य फेरीचा थरार
परळच्या लाल मैदानावर वेग, रणनीती आणि चुरशीच्या लढतींनी रंगवला व्यावसायिक खो-खोचा जल्लोष
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) स्पोर्ट्स क्लब आयोजित ‘पहिली व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा २०२६’ परळ येथील ऐतिहासिक विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या लाल मैदानावरील कै. विवेकानंद पैगावकर क्रीडानगरीत दिमाखात सुरू असून, आजच्या उपउपांत्य फेरीतील सामन्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. प्रत्येक सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली चुरस, अचूक रणनीती आणि दमदार संरक्षणामुळे मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. आता उपांत्य फेरीत मध्य रेल्वे विरुद्ध रचना नोटरी वर्क्स तसेच पश्चिम रेल्वे विरुद्ध महाराष्ट्र पोस्ट यांच्यात जबरदस्त लढती रंगणार आहेत.
पश्चिम रेल्वेची विजयी धडाकेबाज सुरुवात; बँक ऑफ इंडियावर मात
व्यावसायिक गटाच्या पहिल्या उपउपांत्य फेरीत पश्चिम रेल्वेने बँक ऑफ इंडिया संघाचा ११-९ (मध्यंतर ९-४) असा ७.२० मि. राखून २ गुणांनी पराभव करत दमदार विजय मिळवला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पश्चिम रेल्वेने सामन्यावर पकड मजबूत ठेवली. विजयी संघाकडून निखिल सोडिये (२.३०, नाबाद २.३० मि. संरक्षण व २ गुण), आदित्य गणपुले (२.५० मि. संरक्षण व २ गुण), वृषभ वाघ (नाबाद १, ३ मि. संरक्षण), महेश शिंदे (१, १.२० मि. संरक्षण व १ गुण) आणि अभय रत्नाकर (१ मि. संरक्षण व ५ गुण) यांनी शानदार खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. तर पराभूत बँक ऑफ इंडियाकडून राज सकपाळ (१.४० मि. संरक्षण), सुदर्शन चव्हाण (१.१० मि. संरक्षण व ३ गुण), अर्पित तिवारी (१.३०, १ मि. संरक्षण व २ गुण) आणि मयुरेश मोरे (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी कडवी झुंज दिली, मात्र ती अपुरी ठरली.
मध्य रेल्वेचा दणदणीत विजय; महावितरण कंपनी स्पर्धेबाहेर
दुसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट्रल रेल्वेने महावितरण कंपनीचा १९-१२ (मध्यंतर १०-६) असा तब्बल ७ गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. सेंट्रल रेल्वेने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमनाची संधी दिली नाही. विजयी संघाकडून अर्णव पाटणकर (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), शुभम थोरात (१.४० मि. संरक्षण व ३ गुण), विजय हजारे (२ मि. संरक्षण), मिलिंद चावरेकर (१ मि. संरक्षण व ४ गुण), सौरभ घाडगे (नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण) आणि गणेश बोरकर (२.१० मि. संरक्षण) यांनी संघाचा विजय सुकर केला. तर पराभूत महावितरणकडून चेतन बडे (१.१० मि. संरक्षण), सम्यक जाधव (१.२० मि. संरक्षण व २ गुण), वरूण पाटील (१.३०, १.३० मि. संरक्षण व १ गुण), सोहम लोकावले (१ मि. संरक्षण व ३ गुण) आणि अनिकेत चेंदवणकर (१, १.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही.
रचना नोटरी वर्क्सचा थरारक विजय; मुंबई पोलिसांची झुंज व्यर्थ
तिसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने मुंबई पोलिसांवर २१-१८ (मध्यंतर १२-१०) असा ३ गुणांनी रोमांचक विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. दोन्ही संघांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत रंगली होती. विजयी रचना नोटरी संघाकडून प्रथमेश दुर्गावले (१.२० मि. संरक्षण व ३ गुण), हितेश आग्रे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), सदाशिव पालव (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), रुपेश कोंढाळकर (१.५० मि. संरक्षण व १ गुण) आणि गणेश साहू (१.२०, १.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी अप्रतिम कामगिरी करत विजय खेचून आणला. तर मुंबई पोलिसांकडून अक्षय खापरे (१ मि. संरक्षण व ३ गुण), सोहेल शेख (१.३० मि. संरक्षण व ३ गुण), सोहेल कलावंत (१ मि. संरक्षण व ३ गुण), वेदांत देसाई (१, १.४० मि. संरक्षण व १ गुण), हरीश मोरे (१.२० मि. संरक्षण व ५ गुण) आणि सुजित पवाल (१.२०, १.३० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली, मात्र पराभव टाळता आला नाही.
महाराष्ट्र पोस्टचा निसटता विजय; नेवल डॉकची झुंज अपुरी
दिवसातील चौथ्या आणि अत्यंत चुरशीच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र पोस्टने नेवल डॉकचा १६-१५ (मध्यंतर ११-७) असा ४.५० मि. राखून अवघ्या १ गुणाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्याने प्रेक्षकांचा श्वास रोखून धरला होता. विजयी महाराष्ट्र पोस्टकडून अक्षय मासाळ (१.२०, १.३० मि. संरक्षण व १ गुण), सनी तांबे (२.२० मि. संरक्षण व ३ गुण), धीरज भावे (१.२०, १ मि. संरक्षण व १ गुण), प्रतीक देव्हारे (२.१० मि. संरक्षण व २ गुण), प्रद्युम्न पाटील (४ गुण) आणि शुभम शिंदे (१.१०, १.४० मि. संरक्षण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. तर पराभूत नेवल डॉककडून शुभम डोगळे (१.२०, १.१० मि. संरक्षण व १ गुण), साई पिसाळ (१ मि. संरक्षण व ४ गुण), सार्थक जुनघरे (१.३० मि. संरक्षण व २ गुण), अनंत साटळे (१ मि. संरक्षण व ३ गुण), वैभव मोरे (१ मि. संरक्षण व १ गुण) आणि हितेन भोईर (२ गुण) यांनी झुंजार खेळ केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times