‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

शिवराज्याभिषेक सोहळा नियोजन .

         

         शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा

                                                                                                                                                                                                                        -- जिल्हाधिकारी किशन जावळे

 रायगड/पाली - शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची दुरदूश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेला दिल्या.
                       जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता,सा.बां.विद्युत विभाग पेण, प्र.अ.दोडे, कार्यकारी अभियंता,विद्युत सा.बां.विभाग, अलिबाग पुजा जाधव, उप कार्यकारी अभियंता, बांधकाम जि.प.सचिन बैकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.रत्नाकर काळे आदि प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील शासकीय विभागांचे अधिकारी दुरदूश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 
 उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य, पाणी पुरवठा, मंडप, खानपान, राजशिष्टाचार, परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहे. या समित्यांनी आपल्या नेमून दिलेल्या कामांचे योग्य ते सूक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वीरित्या कशाप्रकारे संपन्न होईल ते पहावे. कार्यक्रमाकरिता येणाऱ्या शिवभक्तांसोबत सलोखा ठेवावा. तसेच खर्च करताना काळजी पूर्वक खर्च करुन काटकसरीच्या धोरणाचा अवलंब करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.  
                       आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात.
यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग,पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूचित केले. तसेच पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे आणि आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले.  

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट