‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

"अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुलीचा संताप : कोकणवासीयांचा सवाल – विकास कुठे?"

२०११ मध्ये पत्रकारांच्या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गाची चौपदरीकरण घोषणा झाली.त्यावेळी सांगितले गेले की कोकणवासीयांचा विकास होईल.अपघात कमी होतील, प्रवास जलद होईल.मात्र २०२६ अर्धे जात आले तरी महामार्ग पूर्ण झाला नाही  उलट या रस्त्याने अनेकांचे जीव घेतले.हजारो कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले.अनेकांचे लेकरू गेले,कित्येक कायमचे अपंग झाले.तर अनेक रस्त्यालगतच्या गावांना धुळीचा त्रास सहन करावा लागला,कित्येकांना मणक्याचे आजार,सांध्यांचे आजार झाले. आत्ताया सर्व वेदनांवर मीठ चोळत खारपाडा येथे टोल सुरू होत आहे.प्रश्न असा आहे की ज्यांनी १५ वर्ष  त्रास सहन केला त्यांनी टोल का द्यायचा..?आणि कशासाठी द्यायचं? असा सवाल कोकणवासीय व रायगड व कोकणातील पत्रकार विचारत आहेत. प्रशासनाला सरकारला विचारत आहेत.. पंधरा वर्षानंतर सुद्धा मुंबई गोवा महामार्ग अपूर्णच राहिलेला आहे मग शासनाला टोल घ्यायची घाई का?

      मुंबई गोवा महामार्गाची एकूण लांबी ४७१ किलोमीटर आहे.हा महामार्ग रायगड ,रत्नागिरी,सिंधुदुर्ग.या जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे.पण गेल्या दशकात हा महामार्ग मृत्यू महामार्ग बनला आहे.ही नव्याने ओळख निर्माण झाली आहे.
      २०१४ पर्यंत काम पूर्ण करण्याची डेड लाइन देण्यात आली होती,२०१७,२०२०,२०२३,२०२६ मध्ये सोयीस्करपणे मुदत दिली.
म्हणजे तब्बल १२ वर्षे  कोकण वासियांना अपूर्ण रस्त्याचा त्रास सहन करावा लागलाआणि या काळात
     @असंख्य अपघात झाले
     @खड्या मुळे वाहनांचे नुकसान झाले.
     @पर्यटनावर परिणाम झाला
     @व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले
     @रुग्णवाहिका वेळेत  पोहचल्या नाहीत
     @विद्यार्थी,नोकरदारांचे आयुष्य रस्त्यावर आले.
हे सर्व लोकांनी विकासासाठी सहन केले मात्र विकास कोठेच दिसला नाही.आज परिस्थिती अशी आहे की  अनेक ठिकाणी काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू होत आहे.नागोठणे,खारपाडा  टोल नाक्याबाबत तीव्र ,संताप आहे. आत्ता प्रत्येक संघटना रस्त्यावर उतरत आहे..सर्वांचा उद्देश हाच टोल नाही...
 * एकाबाजूला रस्त्याचे काम अपूर्ण 
 *सर्व्हिस रोड नाहीत,उड्डाणपूल काम नाही
 *:धोकादायक वळणे कायम,
 *वाहतूक कोंडी कायम
आणि दुसऱ्या बाजूला टोलवसुलीची घाई.. कोणती न्यायव्यवस्था?
    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार अनेकदा ७५ टक्के काम पूर्ण झाल्यावरच  टोल आकारणी  केली जाते. पण येथे प्रश्न असा निर्माण होतो की कोकण वासियानी १५ वर्ष सहन केलेला मानसिक त्रास,आर्थिक त्रास,शारीरिक त्रास कोण भरून काढणार...
  मुंबईतून कोकणात जाणाऱ्या माणसांना अनेक टोलनाके  (वृत्तानुसार चार) पार करावे लागतात त्यांचा दर,इंधन महाग,प्रवास वेळखाऊ,वाहनांचे नुकसान  आणि आत्ता  टोल ही भरावे लागणार? 
   कोकण वासियाचे उपन्न मर्यादित आहे.मुंबईत नोकरी करणारा कोकणी माणूस  तो महिन्यातून एकदा तरी गावी जातो,गणपती,यात्रा,होळी, यासाठी त्यांचा प्रवास चैनीचा नसून जीवनाचा भाग आहे.
 
खरं तर सरकारने विचार   करायला हवा 
१५ वर्ष विलंबनचा दंड कोणाला.?
अपघातातील मृत्यूस जबाबदार कोण?
खड्डे यामुळे वाहनाचे झालेले नुकसान या जबाबदार कोण?
रुग्णाच्या हाल अपेष्टांचे उत्तर दायित्व कोणाचे?
जर सरकार जबरदस्तीने  टोल वसूल करत असेल तर  नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकारी आहे.
 
म्हणूनच कोकण वासियांची मागणी स्पष्ट आहे.
मुंबई गोवा महामार्ग कोकणवासीयांसाठी टोल फ्री.
किमान रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी याच्यासाठी टोल माफ असावा.
अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत.
अपघातग्रस्त कुटुंबासाठी विशेष मदत निधी उभारावा.
महामार्ग विलंबनाची न्यायालयीन चौकशी व्हावी.

आमचा विकासाला विरोध नाही पण विकासाच्या नावाखाली मृत्यू, धुळ,खड्डे, आणि टोल  द्या हा व्यवहार  स्वीकार नाही.
या कोकणाचे देशाला पैसा दिला,पर्यटन दिले,उद्योगांना जमीन दिली.अनेक राज्यांना रोजगार दिला,पण कोकण वासियांना परत काय मिळाले. तर....
   अपूर्ण महामार्ग आणि टोलची सक्ती.....

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट