‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

स्मार्ट मीटर जनतेला दिलासा की बिलाचा धक्का ?


तळा (श्रीकांत नांदगावकर)  : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्टुबुशन कंपनी लिमिटेड अर्थात महावितरणकडून राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. सरकारचा दावा आहे की या योजनेमुळे वीज चोरी रोखली जाईल, अचूक बिलिंग होईल आणि ग्राहकांना स्वतःच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांकडून स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात प्रचंड वाढ झाली अशी तक्रार होत असून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू लागले आहे.स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांचे बिल पूर्वीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत अनेक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पूर्वी ७०० ते ८०० रुपये येणारे बिल आता २००० ते ३००० रुपयांपर्यंत गेले, असा आरोप ग्राहक करीत आहेत. स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड पद्धत, रिअल-टाइम रीडिंग आणि ऑटोमॅटिक डेटा ट्रान्सफर यंत्रणा असल्याने पारंपरिक मीटरपेक्षा बिलिंग अधिक काटेकोर होत असल्याचे महावितरण सांगते. परंतु सामान्य ग्राहकांच्या मते, अचानक वाढलेला खर्च त्यांच्या आर्थिक कुवतीबाहेर जात आहे.महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या घरगुती खर्चाच्या काळात वीज बिल हा मोठा प्रश्न बनला आहे.सामान्य जनतेच्या विशेषतः शेतकरी, लघु व्यापारी मध्यमवर्गीय कुटुंबे व ग्रामीण भागातील नागरिक यांना वाढीव बिलाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. अनेक कुटुंबांना महिन्याचा घरखर्च आणि वीज बिल यामध्ये तडजोड करावी लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी आंदोलन करत स्मार्ट मीटर हटवा अशी मागणी केली आहे.विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. विरोधकांचा आरोप आहे कीः स्मार्ट मीटर योजना ही खासगी कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी आहे. सामान्य ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. नागरिकांना योग्य माहिती न
देता जबरदस्तीने मीटर बसवले जात आहेत.
ऊर्जा क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट मीटरमुळे बिल वाढत नाही; उलट पूर्वी चुकीचे किंवा कमी नोंदविले जाणारे वापर आता अचूक मोजले जात असल्याने बिल जास्त दिसू शकते. मात्र ग्राहकांना योग्य मार्गदर्शन आणि पारदर्शक माहिती देण्यात प्रशासन कमी पडत असल्याची टीका देखिल केली जाते. स्मार्ट मीटरचा मुद्दा आता केवळ तांत्रिक राहिलेला नाही. तो सामाजिक आणि राजकीय प्रश्न बनला आहे. गावोगावी बैठका, आंदोलने आणि सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया वाढताना दिसत आहेत. नागरिकांचा प्रश्न एकच डिजिटल सुविधा चांगली, पण सामान्य माणसाच्या खिशावरचा भार कोण कमी करणार? स्मार्ट मीटर योजना ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने उचललेले पाऊल मानले जात असले तरी त्याच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, जनजागृती आणि ग्राहकांचा विश्वास मिळविणे हे मोठे आव्हान ठरत आहे. सरकार आणि महावितरणने वाढीव बिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत, तर य मुद्दा आगामी काळात मोठ्या राजकीय आंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट