ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पालघरवर विजेचा कहर !

पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या ११ वर्षात वीज कोसळून तब्बल २७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या विजेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने 'वीजेला समजून घेताना' या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या चर्चासत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूरचे प्राध्यापक डॉ. प्रमोद पाटील यांनी विजेचा धोका, त्यामागील शास्त्रीय कारणे आणि बचावाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून २०२५ पर्यंत वीज कोसळून २७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे                             

 १५ ते ४० वयोगटातील पुरुष सर्वाधिक बळी

  • राज्यात विजेमुळे झालेल्या मृत्यूंच्या अभ्यासात १५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे
  • जनजागृतीचा अभाव, हलगर्जीपणा आणि सुरक्षित सुविधांची कमतरता ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे नमूद करण्यात आले

पूर्वमान्सून आणि मान्सूननंतरच्या काळात जिल्ह्यात विजेच्या घटना अधिक घडत असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. वीज पडून मृत्यू झाल्यास शासनाकडून संबंधित कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्रअशा घटना नैसर्गिक आपत्ती म्हणून नोंदवल्या जात असल्याने अनेकदा कुटुंबीय इतर शासकीय लाभांपासून वंचित राहतात. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी व्यापक जनजागृती आणि खबरदारी हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे आवाहन चर्चासत्रात करण्यात आले. वीज पडल्यावर मदत मिळते, पण गेलेला जीव परत येत नाही. त्यामुळे सावध रहा, सुरक्षित रहा हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. चर्चासत्रात देण्यात आलेल्या माहितीनुसार, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे तालुके विजेच्या जोखमीच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील आहेत. तर डहाणू, तलासरी आणि वाडा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा धोका असून वादळी हवामानात वीज पडण्याच्या घटना घडतात.                                                                                                                                                               '३०-३० फॉर्म्युला' ठरू शकतो जीवदान

वीज चमकल्यानंतर ३० सेकंदांच्या आत गडगडाटाचा आवाज ऐकू आल्यास वीज पाच किलोमीटरच्या परिसरात पडल्याचे समजावे. अशा वेळी तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच शेवटचा गडगडाट झाल्यानंतरही किमान ३० मिनिटे सुरक्षित ठिकाण सोडू नये, असा महत्त्वपूर्ण सल्ला तज्ज्ञांनी दिला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट