कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

रेवदंडा-चौलच्या मॅंग्रोव्हवर कचऱ्याचा घाला! पर्यावरण धोक्यात; बेफिकीर नागरिकांवर कारवाईची मागणी

  • by
  • Jul 14, 2026



रेवदंडा : रेवदंडा-चौल बायपास मार्गालगत रस्त्याच्या कडेला आणि लगतच्या खाडीत सर्रास कचरा टाकला जात असल्याने परिसरातील पर्यावरणासह मौल्यवान मॅंग्रोव्ह (खारफुटी) वनसंपदा गंभीर धोक्यात आली आहे. प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा थेट खाडीत फेकला जात असल्याने समुद्री जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत असून स्थानिक पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

खाडीत फेकला जाणारा प्लास्टिकचा कचरा भरती-ओहोटीच्या पाण्यासोबत वाहत जाऊन मॅंग्रोव्हच्या मुळांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याबरोबरच पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. याचा फटका मॅंग्रोव्ह परिसरातील वनस्पती, मासे, खेकडे, पक्षी आणि इतर जलचर जीवांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या समस्येचा परिणाम केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचाही धोका वाढला आहे. चौल भाटगल्ली, मुखरी गणपती गल्ली आदी भागांतील पावसाचे पाणी याच खाडीतून वाहून जाते. मात्र, कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा अडथळला गेल्यास पावसाळ्यात पाणी घरांमध्ये शिरण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, परिसरात अधिकृत कचरा संकलनाची व्यवस्था आणि डंपिंगची सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिकांकडून बेजबाबदारपणे रस्त्याच्या कडेला व खाडीत कचरा फेकला जात असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, नियमित स्वच्छता मोहीम राबविणे तसेच मॅंग्रोव्ह परिसरातील प्लास्टिकचा कचरा त्वरित हटविणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी मॅंग्रोव्हचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याने ही समस्या गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट