कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

रोहा: ६ वर्षांपासून भालगाव मोबाईल नेटवर्कच्या प्रतीक्षेत

  • by
  • Jul 16, 2026

रोहा: ६ वर्षांपासून भालगाव मोबाईल नेटवर्कच्या प्रतीक्षेत

४जी टॉवरची फाईल दिल्लीत अंतिम टप्प्यात!

रोहा (प्रतिनिधी): रोहा तालुक्यातील भालगाव येथील २,००० हून अधिक नागरिकांना गेल्या ६ वर्षांपासून गंभीर मोबाईल नेटवर्क समस्येचा सामना करावा लागत आहे. २०२० मधील भीषण चक्रीवादळात येथील दूरसंचार पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. तेव्हापासून आज २०२६ च्या डिजिटल युगातही येथील ७३० कुटुंबांना साध्या फोन कॉलसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

माहिती अधिकारातून (RTI) समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार, भालगाव येथे नवीन बीएसएनएल ४जी टॉवर उभारण्यासाठीची ई-फाईल (Grievance No: DOTEL/E/2026/0034173) सध्या नवी दिल्लीतील मुख्य कॉर्पोरेट कार्यालयात अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारने अजून हे काम कोणत्याही दूरसंचार कंपनीला अधिकृतपणे वर्ग केलेले नाही. दुसरीकडे, गावात सध्या जिओचे कव्हरेज अत्यंत कमकुवत आहे. जिओ कंपनीने फक्त त्यांच्या टॉवरची क्षमता किंवा बँडविड्थ (Bandwidth) वाढवण्याचे आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात ते अजून झाले नाही.

सध्या भालगाव ग्रामपंचायतीत 'प्रशासक' कार्यरत असल्याने स्थानिक पातळीवर पाठपुरावा करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ महेश घाग आणि स्थानिक तरुणांनी थेट केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या प्रलंबित फाईलला तातडीने मंजुरी मिळवण्यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच या नेटवर्कच्या समस्येचे निवारण होईल, अशी आशादायक अपेक्षा आता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

रिपोर्टर

  • ROHAN RASAL
    ROHAN RASAL (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    ROHAN RASAL

संबंधित पोस्ट