आंदोलनाची वेळ का येते? सरकार आणि प्रशासन यांना गांभीर्य नाही का?
- by
- Jul 21, 2026
पेण (दीपक लोके) : लोकशाही व्यवस्थेत आंदोलन हा पहिला मार्ग नसतो,तो शेवटला उपाय असतो.कोणत्याही समाजात नागरिक सुरुवातीला निवेदन देतात, अर्ज करतात,लोकप्रतिनिधींना भेटतात, सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चा करतात परंतु या सर्व उपायानंतरही प्रश्न प्रलंबित राहिले तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते.
प्रश्न असा आहे की आंदोलने वाढत आहेत.याचा अर्थ सरकार आणि प्रशासन यांना जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिले नाही का?प्रश्न एकांगी नाही शासन यंत्रणा मोठी असल्यामुळे अनेक अधिकारी प्रामाणिकपणे कार्य करतात अनेक लोकप्रतिनिधी जनहिताची कामे करतात परंतु त्याचवेळी लाल फितशाही ,निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब,जबाबदारी निश्चित न होणे,राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि आश्वासनांची पूर्तता न होणे यामुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो.
आज अनेक ठिकाणी असे चित्र दिसते की सामान्य नागरिक वर्षानुवर्षे निवेदने देत राहतात परंतु त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
मात्र आंदोलनाची घोषणा होताच बैठका घेतल्या जातात,अधिकारी घटनास्थळी पोहचतात,मंत्री आश्वासने देतात,आणि प्रश्न अचानक महत्त्वाचा ठरतो.त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय सरकार जागा होत नाही हे समीकरण बनले आहे.ही भावना लोकांची बनणे म्हणजे नक्कीच लोकशाहीला घातक आहे.
आंदोलन म्हणजे साकार विरोधी भूमिका नव्हे तर लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम आहे.शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत राहून केलेली आंदोलने लोकशाहीला बळ देतात.मात्र वेळोवेळी त्याच प्रश्नासाठी आंदोलन करणे म्हणजे यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.प्रशासन जर वेळोवेळी जनतेच्या तक्रारी ऐकून पारदर्शक कार्यवाही केली तर निर्णय प्रक्रियेत गती येते. दिलेल्या आश्वासनांची वेळीच पूर्तता केली तर आंदोलन करण्याची गरज भासणार नाही.सरकारवरील विश्वास हा सर्वात मोठा भांडवल आहे तो गमावता काम नये.
लोकशाही केवळ निवडणुकांवर टिकत नाही.ती सरकारच्या उत्तरदायित्वर ,प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर,नागरिकांच्या सहभागावर टिकते .त्यामुळे आंदोलन होण्याअगोदरच त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे.ही मानसिकता लोप नको व्हायला.नाहीतर आंदोलने निषेधाची नव्हे तर असंतोषाची भाषा बनत राहील.
शेवटी आंदोलन केवळ लोकशाहीची ताकद असली तरी ती शासनाच्या अपयशाची वेळ येऊ नये.आदर्श लोकशाही तीच जिथे नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार नाही.संवेदनशील प्रशासन,उत्तरदायी सरकार,आणि जागरूक नागरिक यांचा समन्वय लोकशाही अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनू शकते..
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times