शेतकऱ्यांमध्ये उत्साह; पारंपरिक पद्धतीने शेतात लागवडीची लगबग..
- by
- Jul 22, 2026
समाधानकारक पावसामुळे पेण तालुक्यात भात लागवडीला वेग
पेण : पेण तालुक्यात यंदा सुमारे १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येणार असून समाधानकारक पावसानंतर तालुक्यात खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. मात्र ५ ते ७ जुलैदरम्यान झालेल्या महापुराचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने काही भागातील भाताच्या रोपवाटिका व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
महापुराचा परिणाम न झालेल्या भागात सध्या पारंपरिक पद्धतीने भात लागवडीची कामे वेगाने सुरू असून शेतकरी कुटुंबांसह शेतात उतरून लागवड करत आहेत. दुसरीकडे, ज्या भागात पुराचे पाणी शेतजमिनीत शिरल्याने रोपवाटिका वाहून गेल्या किंवा भाताच्या रोपांचे नुकसान झाले, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी 'रोव' पद्धतीने भात पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. नुकसान भरून काढण्यासाठी पर्यायी पद्धतीचा अवलंब करून शेतकरी खरीप हंगाम वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
तालुक्यात भात हे प्रमुख खरीप पीक असून वेळेत लागवड पूर्ण करण्यासाठी शेतकरी सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात मेहनत घेत आहेत. काही ठिकाणी यांत्रिक पद्धतीने तर बहुतांश भागात पारंपरिक पद्धतीने भात लागवड सुरू आहे.
कृषी विभागाकडून पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच हवामानाची साथ कायम राहिल्यास उर्वरित क्षेत्रातील भात लागवड लवकर पूर्ण होऊन यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य अंतरावर लागवड करणे, संतुलित खतांचा वापर करणे, तण नियंत्रण आणि पिकाची नियमित निगा राखण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. हवामानाची साथ कायम राहिल्यास यंदा भाताचे उत्पादन चांगले होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
महापुराचा फटका बसलेल्या काही भागांमध्ये नुकसान झालेल्या रोपवाटिकांनंतरही अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने लागवडीला सुरुवात केली असून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times