श्रावणी सोमवार निमित्त भाविकांमध्ये हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती
- by
- Aug 18, 2026
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य विभागामार्फत हिवताप /डेंग्यू यासारख्या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शिवमंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या 20 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिवमंदिरांमध्ये हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या 20 ठिकाणच्या शिबिरांमध्ये शिवमंदिरांमध्ये आलेल्या एकूण 8563 भाविकांनी भेट दिली असून यामध्ये 137 रक्तनमुने घेण्यात आले आहेत.
सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे नागरिकांना ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखविण्यात आल्या. तसेच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने, जसे की पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करावेत, त्याचबरोबर पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, पडलेले भंगार साहित्य व टायर्स नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट व ताडपत्री यामध्ये पाणी साचू देवू नये तसेच ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले व आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
डास प्रादुर्भावावर नियंत्रणाकरिता विभागनिहाय विशेष धुरीकरण मोहीमा
डास प्रादुर्भावावर नियंत्रण मिळण्याकरिता नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये विशेष धूरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, सदरची मोहीम 6 गटांमध्ये राबविण्यात येत असून या मोहिमेकरीता 4 ते 5 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील धुरीकरण कर्मचारी एकत्रित येऊन संपूर्ण नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये एकाच दिवशी धुरीकरण करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.
यामध्ये आज 17 ऑगस्ट रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र - सीबीडी, वाशीगाव व दिघा या पहिल्या गटाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये रासायनिक धुरीकरण मोहिम राबविण्यात आली. अशाच प्रकारची मोहीम उद्या मंगळवार दि. 18/8/2026 रोजी दुसऱ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र - से-48, कुकशेत, पावणे, घणसोली येथे तसेच बुधवार दिनांक 19/8/2026 रोजी तिसऱ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र - करावे, नेरुळ-2, तुर्भे, नोसीलनाका, कातकरीपाडा आणि गुरुवार दिनांक 20/08/2026 रोजी चौथ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र - शिरवणे, सानपाडा, इलठणपाडा त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 21/08/2026 रोजी पाचव्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र- नेरुळ-1, जुहुगाव, महापे, चिंचपाडा व शनिवार दिनांक 22/08/2026 रोजी सहाव्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र - इंदिरानगर, खैरणे, राबाडा, ऐरोली येथे विशेष धुरीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांच्यामार्फत सदर मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात येत आहे.
नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने डास प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत असून त्याला जोड म्हणून नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूच्या परिसरातील / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता सुरज पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times