मच्छीमार समाजाच्या समस्या व किनारपट्टीवरील गावांच्या विकासासाठी सहकार्य करणार : उपमहापौर दशरथ भगत
- by
- Aug 19, 2026
मच्छीमार समाजाच्या समस्या व किनारपट्टीवरील गावांच्या विकासासाठी सहकार्य करणार : उपमहापौर दशरथ भगत
नवी मुंबई, दि. १९ ऑगस्ट: मच्छीमार समाजाच्या विविध समस्या, खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या विकासाचे प्रश्न तसेच आगामी विकासकामे आणि शासनाच्या विविध योजनांचा मच्छीमार बांधवांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याबाबत सातपाटी मच्छीमार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उपमहापौर मा. श्री. दशरथ भगत यांची भेट घेतली. उपमहापौर दालनात झालेल्या या बैठकीत मच्छीमार समाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मच्छीमार बांधवांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या समस्या सोडविणे, शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि खाडीकिनारी गावांचा सर्वांगीण विकास यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. तसेच मच्छीमार समाजाच्या प्रश्नांबाबत वनमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक साहेब यांच्याशी चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन उपमहापौर दशरथ भगत यांनी यावेळी दिले.
नवी मुंबई परिसरातील खाडीकिनारी असलेल्या गावांमधील लहान मच्छीमार, मत्स्य व्यवसायाशी संबंधित कुटुंबे आणि मच्छी विक्री करणाऱ्या महिलांच्या विविध अडचणींवर यावेळी विशेष चर्चा झाली. लहान मच्छीमार संस्थांना आणि सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, तसेच शासनाच्या नव्या योजना आणि धोरणांचा लाभ तळागाळातील मच्छीमार बांधवांपर्यंत प्रभावीपणे कसा पोहोचवता येईल, याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
मच्छी विक्री करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाला अधिक सुरक्षित व सक्षम वातावरण मिळवून देणे आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज यावेळी मांडण्यात आली. मत्स्य व्यवसायाला शेती व्यवसायासमान दर्जा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजनांचा मच्छीमार समाजाला अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्याबाबतही चर्चा झाली.
यासोबतच नवी मुंबईतील खाडीकिनारी गावांमधील स्थानिक विकासकामे, मच्छीमार बंदर व संबंधित पायाभूत सुविधांचा विकास तसेच आगामी काळातील विविध विकासकामांमध्ये मच्छीमार समाजाच्या गरजा आणि हिताचा विचार करण्याची मागणी करण्यात आली.
मच्छीमार समाजाच्या या विविध मागण्या व प्रश्नांबाबत राज्याचे वनमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामार्फत आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यात यावे, अशी विनंती सातपाटी मच्छीमार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर दशरथ भगत यांच्याकडे केली.
मच्छीमार नेते श्री. राजेंद्र मेहेर, सातपाटी मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन श्री. विनोद नाईक, संचालक श्री. अनिल चौधरी, संचालक श्री. दीलकुश तांडेल तसेच मच्छीमार समाजसेवक श्री. जयेश आक्रे यावेळी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble