नशेच्या दुष्टचक्रापासून तरुणाईला रोखू या : मुख्यमंत्री
- by
- Aug 20, 2026
नशामुक्त महाराष्ट्र धोरणाबाबत सादरीकरण बैठक
मुंबई : तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, तरुणांना नशेच्या गर्तेत ओढणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. तरुणांच्या समस्या समजून घेऊन त्यांना सहानुभूतीने या दुष्टचक्रापासून दूर ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी नशामुक्त महाराष्ट्र धोरणाबाबत आयोजित सादरीकरण बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी शाळा आणि महाविद्यालयांचा परिसर टपरीमुक्त तसेच अमली पदार्थमुक्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. याबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांनी आपला परिसर अमली पदार्थमुक्त घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच शालेय शिक्षणात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये एनडीपीएस कायद्याचा प्रभावी वापर करून प्रकरणांचा जलदगतीने निकाल लागण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. अशा गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर विशेष सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल नियुक्त करण्याची तरतूद करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नशामुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी शासकीय यंत्रणेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावीपणे काम केल्यास निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडविता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
नशेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांना त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्रे स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती केंद्रे कार्यान्वित करावीत. केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या नशामुक्ती केंद्रांचे सक्षमीकरण करावे आणि आवश्यक असल्यास त्यासाठी निधीची तरतूद करावी, असेही त्यांनी सांगितले.
नशामुक्ती केंद्रांच्या माध्यमातून प्रभावी कार्यवाही होण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली विकसित करावी. नशामुक्त झालेली तरुणाई पुन्हा नशेच्या आहारी जाऊ नये, यासाठी नशामुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याबरोबरच नशेला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवरही नियंत्रण आणावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times