Breaking News
नाशिक (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३६ वा वर्धापन दिन येत्या दिनांक १ जुलै २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ येत्या दिनांक ३० जून २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या माहे मे २०२४ मध्ये झालेल्या उन्हाळी अंतिम परीक्षेमधील व माहे मार्च २०२४ मध्ये झालेल्या कृषी शिक्षणक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
विद्यापीठातर्फे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, कै. भाऊसाहेब हिरे, डॉ. चिंतामणराव देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख, भीमाबाई आंबेडकर, वेणूताई चव्हाण, लक्ष्मीबाई पाटील, डॉ. बापुजी साळुंखे, श्रीमती शारदाबाई पवार, हेमलता फडके व डॉ. भालचंद्र फडके, श्री. मोहनलालजी डागा, डॉ. एस. जी. महाजन, कै. शिवाजीराव सोनार, पद्मसुला, प्रा. के.वाय. सोनावणे, दादासाहेब पोतनीस, गोपाळराव पंडित, कविता मेहेंदळे, मुरलीधर वडनेरे, दादासाहेब रेगे या ज्येष्ठ – श्रेष्ठ व्यक्तींच्या नावाने गुणवंत विद्यार्थ्यांना हे पारितोषिक दिले जातात. प्रमाणपत्र व पुरस्कारनिहाय रकमेचा धनादेश असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे. त्यात विविध विद्याशाखांच्या विविध शिक्षणक्रमांमधील एकूण ३६ पारितोषिक गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जातील. या पारितोषिकांसाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. उगडे सखाराम सान्या, कु. भांडेकर सुवर्णा अर्जुन, आतकोरे निकिता दत्ता, अंधाळे अमोल सखाराम, (वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा), नागरगोजे शिवराज नामदेव, गायकवाड प्रांजल प्रकाशराव, जाधव धनश्री अशोक, दुपार्टे शिल्पा तुळशीराम, गुंडे अवधूत गुणाजी, बर्वे कल्याण ज्ञानेश्वर, मुजावर रुक्साना सरदार, रिते वर्षा जयसिंग, खैरे रवींद्र सदाशिव, सोनुर्लेकर प्रसन्ना प्रदीप, महानाव्यार राहुल दत्तात्रय, पाटील रणजीत तानाजी, गौरीहार शाम संजय, जोशी योगिता सचिन, रसाळ सुरज संजय (मानव्य आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखा), कार्डे शिवकन्या सुधाकर, वागडोळे सचिन मदन (शिक्षणशास्त्र विद्याशाखा), पवार सुरेखा रंगनाथ, जाधव सोनम दिगंबर, इंगोळे निवृत्ती ज्ञानेश्वर, जुंदळे कुमार बसवेश्वर, पुसदेकर वैशाली राजू (कृषी विज्ञान विद्याशाखा) यांचा समावेश आहे. सदर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी ही विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील Convocation या शीर्षकांतर्गत प्रसिध्द करण्यात आलेली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड व परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times