"बंगालमध्ये सत्ताबदल, पण ममता लढाईस सज्ज"
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार
नवी दिल्ली: पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी एकप्रकारे निवडणुकीचा निकाल अमान्य केला, एवडेच नव्हे तर, मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास स्पष्ट नकार दर्शवला. त्यामुळे बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय रंगण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
'राष्ट्रपती राजवट' लागू शकते ?
मुख्यमंत्री पराभूत होऊनही पदावर कायम राहिले आणि राजीनामा देण्यास नकार दिला. अशा बिकट परिस्थितीत राज्यपाल केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवून अनुच्छेद ३५६ अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. राष्ट्रपती राजवट लागू झाली की, राज्याची संपूर्ण सूत्रे थेट केंद्र आणि राज्यपालांच्या हाती येतात आणि मुख्यमंत्र्याचे अधिकार संपुष्टात येतात.
१. कमालीची रात्रकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला त्या राज्यात सत्ताबदल झाला भाजपने घवघवीत यश मिळवत तृणमूलची १७ वर्षांची राजवट संपुष्टात आणली. भाजपने जागांचे द्विशतक ठोकत दोन-तृतीयांश बहुमत मिळवले. 2. सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या तृणमूलच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या. त्यानंतर मंगळवारी कोलकत्यात पत्रकार परिषद घेत ममतांनी निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनादेशामुळे आमचा पराभव झाला नाही, तर कारस्थान रचून आम्हाला हरवण्यात आले. ३. मी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यासाठी मी राज्यपालांकडे जाणार नाही माझ्यावर घटनात्मक निकषांनुसार कुठली कारवाई करायची असेल तर जरूर करावी, असे आव्हान त्यांनी दिले. ४. मतमोजणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता घडल्या जवळपास १०० जागांधी अक्षरशः लूट करण्यात आली. तृणमूलचा निवडणुकीतील लहा भाजपशी नव्हताव आमचा लढा भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाशी होता. ५. माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मी अशी निवडणूक कधीच पाहिली नाही. इतिहासात काळा अध्याय जोडला गेला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार खलनायक ठरले, अशी घणाघाती टीका ममतांनी केली, केंद्रीय यंत्रणांच्या कार्यशैलीविषयीही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ६. पुढील वाटचालीविषयीचे सूतोवाचही ममतांनी केले. राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांची इंडिया आधाडी मजबूत करण्यावर आता माझा फोकस असेल आघाडीचे अनेक नेते माझ्या पाठिशी उभे राहिले, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, हेमंत सोरेन आदीनी माझ्याशी फोनवरून संवाद साधला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav