‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

"राज्याचा निकाल ९२.०९%, कोकण आघाडीवर"

मुलींनीच मारली बाजी मुंबई: हाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. १२वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्थापनेपासून कायम राखलेला राज्यातील अव्वल निकालाचा मान यंदाही अबाधित ठेवला आहे

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेत कोकण मंडळाचा एकूण निकाल २७.६२ टक्के लागला, गतवी मार्च २०२५ मध्ये हा निकाल २८.८२ टक्के होता. त्यामुळे यंदा निकालात १.२० टक्क्यांनी घट झाली असली, तरी राज्यात कोकण मंडळाने पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागातील रलागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ६४० माध्यमिक विद्यालयांमधून ११४ परीक्षा केंद्रांवर एकूण २५ हजार २२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले यांपैकी २४ हजार ५७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.६२ टक्के इतका लागला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. बोद्धचि अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाचतची माहिती दिली आहे. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. ९ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वांत कमी लागला असून तो ८८.४१ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. यावेळी ९४.९६ टक्के मुली तर ८९.५६ टक्के मूले उत्तीर्ण पास झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यानी अधिक लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण विद्याव्यांची नोंदणी १५ लाख ५५ हजार ०२६ इतकी होती त्या पैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या विद्यार्थ्यानी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्याबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                                                             
                                                                       गायत्री पाटीलला १०० टक्के
 उमरगा तालुक्यातील गायत्री पाटील हिने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात २७९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले असून त्यामध्ये गायत्रीचाही समावेश आहे
                                                                
                                                               कचरा वेचक प्रियंका कांबळे उत्तीर्ण
कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. कचरा वेचून घर चालविणाऱ्याा प्रियंकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिवसा कचरा वेचून रात्री अभ्यास करून तिने हे यश मिळविले आहे.


विभागनिहाय आकडेवारी समोर

कोकण :                ९७ .६२ टक्के

पुणे :                     ९४.२४ टक्के

नागपूर :                 ८९.०७ टक्के

मुंबई :                    ९४.९७ टक्के

कोल्हापूर :              ९५.४७ टक्के

अमरावती :             ९०.५० टक्के

नाशिक :                ९०.५३ टक्के

लातूर :                   ८८.४२ टक्के

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट